नाशिक : उपनगरपासून लेखानगर मार्गे चांडक सर्कलपर्यंत भरधाव वेगात आलेल्या मद्यधुंद अवस्थेतील प्राध्यापक कारचालकाने अनेकांना धडक देत उडवले. चौघांपैकी दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान मद्यधुंद कारचालकाने कार चालविताना अनेकांचे जीव धोक्यात घातले यात एका चाकाचे टायर फुटून डिस्कवर त्याने कार चालवली अखेर चांडक सर्कल परिसरात पाठलाग करीत आलेल्या पोलिसांनी त्याला रोखले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत उपनगर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदरचा प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. (thrill of drunk driver in city Four injured two seriously Nashik Latest Marathi News)
साहेबराव दौलत निकम (रा. मेरी) असे या मद्यधुंद चालकाचे नाव असून तो बिटको महाविद्यालयात प्राध्यापक आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकम हा मदयधुंद अवस्थेमध्ये त्याच्या कारने (एमएच जीएक्स ३०९६) नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाजवळून निघाला. त्यानंतर तो अशोका मार्गवरून लेखानगरच्या दिशेने येताना त्याने डीजीपी नगर परिसरात एका वाहनास धडक दिली. भरदार वर्गातील या कारचा काही नागरिकांनी पाठलाग सुरू केला तसेच पोलिसांनाही भरधाव्यगातील कारची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी तात्काळ नियंत्रण कक्षावरून अलर्ट संदेश दिल्याने पोलीसही या कारचालकाच्या मागावर निघाले.
दरम्यान, लेखानगर येथेही कारचालकने दोघांना उडवत तो इंदिरानगर बोगद्याजवळ आला. तेथेही एकास धडक दिल्याचे समजते. मुंबईनाका परिसरातच त्याच्या कारचे डाव्या बाजूकडील पुढचे चाकाचे टायर निघून गेल्याने लोखंडी व्हीलवर निकमने कार चालवत मुंबईनाक्याहून चांडक सर्कलकडे आला. येथून तो स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या दिशेने जाताना रस्त्यावर समोर येईल त्यास त्याने धडक दिली. त्यात अविनाश प्रल्हाद साळुंके (४५, रा. नवशा गणपती जवळ, गंगापूर रोड) यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यानंतर दुचाकीवरून येणाऱ्या पंकज शंकर मोरे (२७, रा. विजय नगर, सिडको) व गणेश सत्या या दोघा युवकांना निकमने धडक दिली. त्यात पंकजच्या दोन्ही पायांवरून कार गेल्याने त्यास गंभीर दुखापत झाली आहे. तरीही तो थांबत नव्हता. त्यानंतर चांडक सर्कल व शासकीय विश्राम गृहापर्यंत कार नेत तेथून निकमने पुन्हा चांडक सर्कल येथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे शासकीय वाहन आडवे लावल्याने निकमची कार वाहनावर जाऊन आदळली. त्यानंतर पोलिसांनी निकमला ताब्यात घेत मुंबईनाका पोलिस ठाण्यात नेले. तर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
साळुंखे, मोरे खासगी रुग्णालयात
कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पंकजच्या बहिणीचा काही दिवसांत विवाह आहे. पंकज आणि गणेश सत्या हे दोघे समर्थ आयटी सोल्युशन कंपनीत कामास असून काम संपवून ते जात होते. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून रात्री उशिरा त्यास जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . तर अविनाश साळुंके हे मविप्र संस्थेत मुख्याध्यापक असून त्यानाही गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे
असा रंगला थरार
बिटको महाविद्यालय- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - डीजीपी नगर - अशोका मार्ग - लेखा नगर - मुंबईनाका - चांडक सर्कल - जलतरण तलावासमोरील सिग्नल - मायको सर्कल - चांडक सर्कल - शासकीय विश्राम गृह - पुन्हा चांडक सर्कल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.