exam.png 
नाशिक

परीक्षांच्या अर्जासाठी 'एनटीए'तर्फे मुदतवाढ; सात अभ्यासक्रमांचा समावेश

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नियोजित परीक्षा स्थगित करण्यासोबतच विविध परीक्षांना प्रविष्ठ होण्यासाठी अर्ज करण्यात अडथळा येऊ नये, या करीता देखील मुदतवाढ दिली जात आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सीतर्फे विविध सात प्रवेश परीक्षांकरीता अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केलेली आहे. इग्नूच्या प्रवेशासह अन्य विविध परीक्षांचा यात समावेश आहे. 

परीक्षांच्या संदर्भातील अर्ज करण्याच्या सुधारीत तारखा जाहीर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असतांना शैक्षणिक वेळापत्रक कोलमडत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. या परीक्षा एप्रिल, मे महिन्यात नियोजित होत्या. दुसरीकडे विविध प्रवेश परीक्षांकरीता अर्ज करण्याच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) यांच्यामार्फत परीक्षांच्या संदर्भातील अर्ज करण्याच्या सुधारीत तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामूळे इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विविध सात अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारणत: एप्रिल अखेर, मे महिन्यातील पंधरा दिवसांची मुदत मिळणार आहे. या वाढीव मुदतीतील काळात विद्यार्थ्यांनी परीक्षेचा भरपुर सराव करावा. कुठलीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन एनटीएतर्फे केले आहे. 

असे आहे सुधारीत वेळापत्रक 

(अभ्यासक्रम, परीक्षेचे नाव अर्जाची सुधारीत मुदत)

नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट (एनसीएचएम) जेईई 2020 ----- 30 एप्रिल 

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (इग्नू) पी.एचडी., एमबीए ----- 30 एप्रिल 

इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) 2020 ----- 30 एप्रिल 

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी एट्रान्स एक्‍झाम (जएनयुईई) ----- 30 एप्रिल 
युजीसी-नॅशनल इलिजिब्लीटी टेस्ट (युजीसी-नेट) जून 2020 ----- 16 मे 

सीएसआयआर-नॅशनल इलिजिब्लीटी टेस्ट जून 2020 ----- 15 मे 

ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रान्स टेस्ट ----- 31 मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT