coronavirus-4.jpg
coronavirus-4.jpg 
नाशिक

Coronaupdates : जिल्ह्यात १० हजार २८० रुग्ण कोरोनामुक्त...तर 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनामुक्‍त होणाऱ्या रुग्‍णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असली तरी बुधवारी (ता. २९) दिवसभरात ५०९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या दहा हजारांहून अधिक झाली आहे. तर आतापर्यंत दहा हजार २८० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. 

१० हजार २८० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार २८० रुग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत गुरुवारी (ता. 30) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १० हजार २८० कोरोनाबाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५८५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९  तर जिल्ह्याबाहेरील ०२ असे एकूण २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १३  हजार २६३ रुग्ण आढळून आले आहेत.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण

नाशिक १४९, चांदवड ५१, सिन्नर १०१, 
दिंडोरी ४९, निफाड ११९, देवळा ६९,  
नांदगांव ६७, येवला २५, त्र्यंबकेश्वर १५, 
सुरगाणा १६, पेठ ०३, कळवण ०२,  
बागलाण २४, इगतपुरी ९८, मालेगांव ग्रामीण ३५ 
एकूण  ८२३  

कोरोनाने मृत्यु झालेले

नाशिक ग्रामीण ११३, 
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २६७, 
मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४,  
जिल्हा बाहेरील २०, 
एकूण ४८४  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT