MHT CET 2023 esakal
नाशिक

Nashik News: यंदा व्‍यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळेतच प्रवेश; CET परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या सीईटी परीक्षांना विलंब झाल्‍याने पुढील संपूर्ण वेळापत्रक खोळंबत होते. शैक्षणिक वर्ष २०२३- २४ मध्ये हा खोळंबा टाळला जाण्याची शक्‍यता आहे.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केलेले आहे. मार्च महिन्‍यापासून या परीक्षा नियोजित असल्‍याने जुलै-ऑगस्‍टपर्यंत प्रवेश प्रक्रिया आटोपण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे. (Timely admission to vocational courses this year Probable schedule of CET exams announced Nashik News)

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ करिता विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली. अनेक अभ्यासक्रमांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मोठा कालावधी उलटला होता. त्यामुळे मर्यादित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह परीक्षा घेण्याचे शिवधनुष्य महाविद्यालय प्रशासनाला पेलावे लागत होते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता वेळमर्यादेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त केली जात होती. या दरम्‍यान विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा व योग्‍य प्रकारे नियोजन करता यावे, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या सीईटी परीक्षांच्‍या संभाव्‍य वेळापत्रकाची घोषणा केलेली आहे.

गतवर्षीची पुनरावृत्ती नको

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करितादेखील अशाच प्रकारे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. परंतु, शुद्धीपत्रक काढताना या तारखांमध्ये बदल करत ऑगस्‍टमध्ये सीईटी परीक्षा ढकलण्यात आल्‍या होत्‍या. यामुळे प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा झाला होता. यावर्षी याबाबत पुनरावृत्ती व्‍हायला नको, अशी माफक अपेक्षा पालक, विद्यार्थ्यांकडून व्‍यक्‍त होते आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

प्रमुख परिक्षेच्या संभाव्‍य तारखा-

अभ्यासक्रम संभाव्‍य परीक्षा कालावधी

* एमएचटी-सीईटी

पीसीएम ग्रुप ९ ते १३ मे

पीसीबी ग्रुप १५ ते २० मे

* एमबीए सीईटी १८ व १९ मार्च

* एलएलबी (५ वर्षे) १ एप्रिल

* एलएलबी (३ वर्षे) २ व ३ मे

* बी.एड.-एम.एड. २ एप्रिल

* बीए/बी.एस्सी बी.एड. २ एप्रिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT