YCMOU Admission esakal
नाशिक

Nashik : 'मुक्‍त' च्‍या प्रवेशासाठी आज अखेरची मुदत ; विलंब शुल्‍कासह प्रवेशाची संधी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू असून पदविका, पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जात आहेत. विलंब शुल्‍क भरून प्रवेश घेण्यासाठीची वाढीव मुदत उद्या (ता.३१) संपत आहे. तत्‍पूर्वी पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविता येणार आहे.

मुक्‍त विद्यापीठातर्फे प्रवेश प्रक्रियेच्‍या सुरुवातीच्या टप्‍यात नियमित शुल्‍कासह प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिलेली होती. राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या विद्यापीठाच्‍या विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. निर्धारित मुदतीत काही कारणास्‍तव प्रवेश घेऊ न शकलेल्‍या विद्यार्थ्यांना संधी उपलब्‍ध करून देण्याच्‍या उद्देशाने पुढील टप्‍यात विलंब शुल्‍कासह प्रवेश घेण्याचा पर्याय उपलब्‍ध करून दिला होता.(Today is last date for entry of YCMOU Entry From tomorrow late fee charge for admission Nashik News)

विद्यापीठाचे कुलगुरूंच्या मान्‍यतेनुसार ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. कृषी शिक्षणक्रम तसेच बी.एड., व बी.एड. (विशेष) या शिक्षणक्रमाव्‍यतिरिक्‍त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांकरिता ही मुदतवाढ लागू होती.गेल्‍या १६ ऑक्‍टोबरपासून पंधरा दिवसांसाठी मुदत वाढविलेली होती.

त्‍यानुसार शंभर रुपये विलंब शुल्‍क भरून विद्यार्थ्यांना ऐच्छिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. त्‍यासाठी उद्या (ता.३१) अखेरची संधी उपलब्‍ध असेल. प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्‍यता मुदत १ ते १० नोव्‍हेंबर अशी असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज विहित मुदतीत सादर करून निवडलेल्‍या अभ्यासकेंद्रावर संपर्क साधून प्रवेशास मान्‍यता घ्यावी, असे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख यांनी सूचनापत्रकाद्वारे स्‍पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT