Fraud

 

sakal 

नाशिक

सायबर चोरट्याचा वृद्धाला १८ लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. २२ : सायबर भामट्यांनी ७३ वर्षीय वृद्धाला फोन करून, तुमच्या सीम कार्डचा वापर करून धमक्या, खंडणी व अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचे सांगत मुंबई पोलिस, ईडी आणि एनआयएकडून तपास सुरू असल्याचे धमकावले आणि डिजिटल हाउस अरेस्ट करीत तब्बल १८ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आली आहे.

याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ७३ वर्षीय वृद्धाच्या फिर्यादीनुसार, गेल्या महिन्यात त्यांच्या मोबाईलवर सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप कॉलवरून संपर्क साधला. त्या वेळी संशयिताने ‘डेटा प्राेटेक्शन बाेर्ड ऑफ इंडिया’कडून महावीर सिंग बोलत असल्याचे सांगितले.

वृद्धाच्या मोबाईलमध्ये असलेल्या सीम कार्डचा वापर करून अनेकांना धमकावले जात आहे, खंडणी मागितली जात आहे. अश्लील व्हिडिओ कॉल केला जात असल्याची तक्रार मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात दाखल असून, या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांसह ईडी आणि एनआयए या तपास संस्थांकडून केला जात असल्याचे वृद्धाला सांगितले.

यानंतर संशयिताने व्हिडिओ कॉल करीत, सीबीआय कार्यालय, पोलिस ठाणे, बनावट कागदपत्रे व खोटे अटक वॉरंट दाखवून त्यांना अटकेची भीती दाखविली. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT