Yuva Sena District Chief Farhan Khan, Taluka Chief Sagar Hire while giving a statement to Manager Pawar on the toll plaza at Pimparkkhed.
Yuva Sena District Chief Farhan Khan, Taluka Chief Sagar Hire while giving a statement to Manager Pawar on the toll plaza at Pimparkkhed. esakal
नाशिक

Nashik News: पिंपरखेड येथील टोलवसुली अखेर बंद! महामार्गाचे काम अपूर्ण, मूलभूत सुविधा नसताना सुरू केली होती वसुली

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असताना पिंपरखेड येथील टोल प्लाझावर सुरू करण्यात आलेली टोलवसुली पहिल्याच दिवशी शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली.

काम पूर्ण नसताना वसुली कशी असा प्रश्न युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिक व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोरल असोसिएट्सच्या व्यवस्थापकांना केला. (Toll collection at Pimparkhed closed by shiv sena yuva highway work incomplete recovery started without facilities Nashik News)

या टोलवसुलीतून नांदगाव तालुक्यातील सर्व प्रकारच्या वाहनधारकांना वगळण्यात यावे असा आग्रह फरहानखान, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे यांच्यासह उपस्थितीत आंदोलकांनी व्यवस्थापक पवार यांच्याकडे धरला, त्यानंतर आमदार सुहास कांदे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक यंत्रणा यांच्यातील संयुक्त बैठकीत अंतिम पुढील निर्णयपर्यत टोल वसुली करण्यात येणार नसल्याची ग्वाही टोल प्लाझा व्यवस्थापकांनी दिली. यानंतर टोलवसुली थांबविण्यात आली.

चांदवड ते जळगावपर्यत राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ जे वरील चाळीसगाव-नांदगाव-मनमाड विभागासाठी टोल वसुली आजपासून सुरू करण्यात आली होती. टोलप्लाझाच्या नजीकच्या पिंपरखेड, नस्तनपूर, जळगाव खुर्द, न्यायडोंगरी, चांदोरे, रणखेडा आदी गावातील शेतकऱ्यांसह स्थानिक वाहनधारकांना अचानक सुरु झालेल्या या टोलवसुलीची झळ बसली.

सकाळपासून दुपारी चारपर्यंत अनेक वाहनधारकांचे टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांशी विवादही झाले. काहींनी निमूटपणे टोल दिले. याबाबत समजताच शिवसैनिक व युवा सैनिकांनी पिंपरखेड येथील टोलप्लाझा येथे जात जाब विचारला.

व्यवस्थापक पवार यांना निवेदन देण्यात आले. महामार्गांवर वाहनचालकांना मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध केलेल्या नसताना वसुली कशी असा प्रश्न त्यांनी विचारत टोलनाका तात्काळ बंद करावा आदी मागण्या केल्या.

राजेंद्र देशमुख, ज्ञानेश्वर कांदे, अय्याज शेख, महेंद्र गायकवाड, बापू जाधव, भावराव बागूल, भैय्या पगार, सचिन पगार, शशी सोनवणे, नितीन सोनवणे, गणेश हातेकर, गौरव बोरसे, अमान खान, योगेश इमले, मन्नू शेख, आझाद पठाण, गणेश कुमावत, रोशन बोरसे, प्रीतम पवार, बाळा काकळीज, मनीष बागोरे, वाल्मिक निकम, सचिन उदावंत, संदीप मवाळ, प्रथमेश बोरसे, अविनाश लुटे, जीवन भाबड, आबा बोरसे, चेतन बोरसे, पवन झाडगे, गोपी मोरे, गोकूळ मोरे, विकी बोरसे, सोनू इप्पर, गणेश पवार, जीवन भाबड आदींसह शेकडो युवा सेनेचे व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT