fall in market price of tomatoes esakal
नाशिक

Nashik Tomato Rate Fall : टोमॅटो बाजारभाव दरात घसरण; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rate Fall : महिन्या भरापूर्वी टोमॅटो दर चांगले मिळत होते, शेतकऱ्याना बऱ्याच कालावधीनंतर चांगला बाजारभाव मिळत असल्याने आनंदाचे वातावरण होते. मात्र, पंधरा दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण होताना दिसत आहे.

शुक्रवारी (ता. ६) झालेल्या लिलावात सरासरी पन्नास, सर्वाधिक साठ रुपये भाव मिळत आहे. (tomato rate fall in nashik news)

शेतकरी कधी अवकाळी पाऊस धोका देतो , तर कधी आसमानी तर कधी सुलेमानी नेहमीच संकटांनी घेरलेला असतो. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादन झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले होते.

अक्षरश बाजारभाव कमी मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आंदोलनदेखील केले होते. या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने आवक कमी झाली होती.

परिणामी बाजारभाव चांगला मिळाला होता. सद्यःस्थितीत नाशिक बाजार समितीत सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव, दोडी- दापूर, मुसळगाव, गुळवंज, दातली, खोपडी, समशेरपूर या भागातून टोमॅटो येत आहे.

गेल्या चार- पाच दिवसांपासून आवक वाढली आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावात टोमॅटो प्रतिक्रेटला सरासरी पन्नास तर सर्वाधिक साठ रुपये बाजारभाव मिळाला. जवळपास दहा हजार ते बारा हजार कॅरेट्स आवक झाली आहे.

उत्पादन खर्चही निघेना

महिनाभरापूर्वी टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो या कारणाने शेतकरी थोडाफार सुखावला होता मात्र हा आनंद काही काळापुरताच मर्यादित होता असे वाटू लागले. दिवस गणित ज्या प्रमाणात आवक वाढते आहे.

त्याच प्रमाणात दरातदेखील घसरण व्हायला सुरवात झाली आहे. सर्वसाधारणपणे एक एकर टोमॅटो उत्पादनासाठी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. मात्र, आजची टोमॅटो दलाची दराची घसरण बघता उत्पादन खर्चही निघेल की नाही या चिंतेत शेतकरी राजा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT