Tourists are coming in large numbers to waterfall near bhavali nashik news esakal
नाशिक

Bhavali Dam : भावलीजवळील धबधब्यावर पर्यटनाला बहर; एक दिवसीय सहलींसाठी मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Bhavali Dam : तालुक्यात व परिसरात काही दिवसांपासून संततधार सुरू असून तालुक्यातील डोंगर भागावर अनेक ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत.

अशा निसर्गाने बहरलेल्या भावली धरणाजवळील डोंगर कड्यावरून वाहणारा धबधबा आता पहिल्याच पावसात ओसंडून वाहत आहे.

शेकडो मीटर उंचीवर असलेल्या या धबधबातील पाणी खाली कोसळत असते. त्यामुळे पर्यटकांसाठी हा धबधबा यंदाही आकर्षणाचा विषय ठरला आहे. (Tourists are coming in large numbers to waterfall near bhavali nashik news)

मागील तीन वर्ष कोरोनामुळे तालुक्यात पर्यटनाला बंदी होती. मात्र यंदापासून नाशिक मुंबई आदी भागातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत. एक दिवसीय सहलीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. धबधब्याचे नयनरम्य दृश्य पर्यटक आपल्या नजरेत सामावून ठेवत असतात.

इगतपुरीत मॉन्सून सक्रिय होऊन काही दिवसच झाले असले तरी भावलीचा मुख्य धबधबा हा प्रवाहित झाला असून त्याने रौद्र रूप धारण केले आहे. नगरपरिषदेच्या तलावाजवळील धबधबाही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येथून पडणारे पाणी जोरदार हवेमुळे पुन्हा वर जाताना दिसत असल्याने एक वेगळेच विहंगम दृश्य दिसते, त्यामुळे पर्यटक साहजिकच येथे थांबतात.

रस्त्यांवर गाड्या थांबवू नका

शनिवारी (ता.१५) पुन्हा एकदा ही गर्दी पाहायला मिळाली. उद्या रविवारी (ता.१६) तर इगतपुरीत पर्यटकांचा महापूर दिसेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कसारा घाटातही अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले असून प्रवासी घाटामध्येच महामार्गावर कार उभ्या करून सेल्फि काढत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

पर्यटकांनी कसारा घाटात गाड्या उभ्या करू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी केले आहे. भावलीकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहन तपासणी केली जात असून मद्यपान करू नये असेही आवाहन श्री. सुर्व यांनी केले आहे .

रानभाज्या सहज उपलब्ध

निसर्गाने बहरलेल्या व पाण्याने ओसंडून वाहणारे धबधबे यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे. पावसामुळे रान भाज्यांही बहरल्याने महिला, युवांना रोजगार मिळत आहे. अनेक पर्यटकांनाही हा औषधी रानमेवा अगदी सहज उपलब्ध होत असल्याने त्यांचा आनंद घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT