tractor-tipping-trailer.jpg 
नाशिक

नांदगावला मिळाली 'या' व्यवसायामुळे नवी ओळख; उत्तर महाराष्ट्रातून मोठी मागणी

भगवान हिरे

नाशिक : (साकोरा) स्टेशनचे गाव असलेल्या नांदगावाने ओळख असता आपली ‘ट्रॅक्टर ट्रेलर’चे नांदगाव, अशी आपली नवी ओळख तयार केली आहे. उत्तर महाराष्ट्रातून वाढती मागणी असून ३० बेरोजगारांना हक्काचा व्यवसाय मिळाला आहे. वाचा सविस्तर...

उत्तर महाराष्ट्रात वाढती मागणी

नांदगाव येथे महाबली, सद्‌गुरू, जय जनार्दन, जय मातादी व लक्ष्मी माता ट्रेलर असे पाच ट्रेलर बनविण्याचे कारखाने असून, येथील तयार झालेली ट्रेलर (ट्रॉली) औरंगाबाद, नाशिक, नगर व धुळे जिल्ह्यांत जात आहेत. येथील व्यावसायिक चांगल्या प्रकारचे लोखंड, टायर, पंप, ॲक्सल, पाटे व ट्रॉलीची फिनिशिंग चांगली असते म्हणून मागणीत दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक ट्रेलर कारखानदाराने कोरोना महामारीच्या काळात लॉकडाउन असताना आपल्या कारागिरांना काम दिले. जास्त नफा न मिळवत पंचवीस ते तीस ट्रॉलीची प्रत्येकाने विक्री केली. शेतकरी चांगल्या प्रकारे फिनिशिंग, टिकाऊ आणि ट्रॅक्टरला शोभणारा ट्रेलर मिळत असल्याने समाधान व्यक्त करतात. 

ट्रेलरसाठी येणारा खर्च 

चायनल, अँगल, प्लेट : ६५ हजार रुपये 
ॲक्सल : आठ हजार ५०० 
पाटे : आठ हजार ६०० 
हॅड्रॉलिक पंप : चार हजार ५०० 
डिक्स : तीन हजार ६०० 
हुकगठा : एक हजार 
टायर : २० हजार ५०० 
मजुरी : पाच हजार 
कलर : दोन हजार ५०० 
पासिंग खर्च : सात हजार 
वेल्डिंग रॉड : एक हजार १०० 
एकूण खर्च : एक लाख २५ हजार ते एक लाख २८ हजार 
विक्री किंमत : एक लाख ३२ हजार ते एक लाख ३५ हजार 

नांदगाव येथील ट्रेलर ट्रॅक्टरबरोबर मोकळी चालते. लोखंड व पत्रा चांगल्या कंपनीचा वापरतात, तसेच फिनिशिंग चांगली आहे. आम्हा शेतकऱ्यांना नांदगाव येथील ट्रेलर परवडणारा आहे. - प्रकाश चव्हाण, शेतकरी, वाखारी 

लॉकडाउनच्या तीन महिन्यांत आमच्या कारखान्यात तीस ट्रेलर बनल्यामुळे माझ्यासह माझे पाच सहकाऱ्यांना लॉकडाउन काळात पैशांची उणीव भासली नाही, याचा मला अभिमान आहे. - वाल्मीक वानखेडे, ट्रेलर कारागीर 

ट्रेलर व्यवसायामुळे कारखानदाराने सात ते सहा वेल्डर लोकांना काम दिले. जास्त नफा न काढता आम्ही चागल्या प्रकारे ट्रेलर बनवून शेतकऱ्यांचा फायदा करतो. त्यामुळे नांदगाव येथील ट्रेलरला वाढती मागणी आहे. - उमेश शेलार, संचालक, सद्‌गुरू ट्रेलर, नांदगाव  

संपादन - किशोरी वाघ


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT