traffic esakal
नाशिक

Nashik News : वाहतूक कोंडीचा वाद आता न्यायालयात? कंपन्यांना कायदेशीर नोटीस

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : नागापूर, पानेवाडी येथील इंधन कंपनीचे इंधन टँकर मनमाड नांदगाव मार्गावर सर्रास उभे केले जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होत असल्याने याकडे कंपनी प्रशासनासह पोलिसही दखल घेत नसल्याने आता हा वाद थेट न्यालयात जाण्याची शक्यता असून याबाबत कंपनीने तातडीने उपाययोजना करावी यासाठी उपजिल्हाधिकारी, परिवहन अधिकारी, सर्व इंधन कंपन्यांना कायदेशीररीत्या नोटिसा देण्यात आल्याची माहिती ॲड. सुदर्शन थोरे यांनी दिली. (Traffic congestion dispute now in court Legal notice to companies Nashik News)

मनमाड - नांदगांव या महामार्गाचे नव्याने चौपदरीकरण झाल्याने सदर मार्ग आता रुंद झाला आहे. मात्र याच मार्गावर असलेल्या इंधन कंपनीचे इंधन टँकर मार्गाच्या कडेला उभे केले जात असल्याने याविरोधात परिसरातील गावातील सरपंच,

ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून याबाबत कंपनी प्रशासनाकडे तक्रारी करूनही गांभिर्याने दखल न घेता टोलवाटोलवी करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरु असल्याने या मार्गावर मोठा अपघात घडल्यास मोठा मोठा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याबाबत आता ॲड. सुदर्शन थोरे यांना देखील वाईट अनुभव आल्याने त्यांनी आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पानेवाडी, नागापूर येथे असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल,

गॅस प्रकल्प असून या सदर कंपनी गॅस, इंधनाची ने-आण करण्यासाठी कंपनीत दररोज शेकडो टँकर ये जा करत असल्याने वाहनांचे सुरक्षित नियमांचे पालन केले जात नसून टँकर उभे करण्यासाठी पार्किंग असतानाही त्याचा वापर न करता सर्रास मार्गावर लावली जातात.

टँकर उभी करण्यासाठी आपले नियंत्रण असते व त्यासाठीची योग्य ती सुविधा पुरविण्याची कायदेशीर जबाबदारी कंपनीची आहे. परंतु कंपनीत इंधन भरण्यासाठी आलेले टँकर हे मनमाड-नांदगाव रोडवरील कंपनीच्या गेट समोरील हमरस्त्यावरच अत्यंत निष्काळजी व बेशिस्तपणे उभे केली जातात.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडथळा निर्माण होऊन अपघात होतात. मागील काही दिवसात अशा परिस्थितीमुळे सदर ठिकाणी गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहे.

त्यामुळे अनेक प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले तर काहींना जिवास मुकावे लागले. याबाबत नागापूर सह इतर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी कंपनीकडे लेखी तक्रार देऊनही ही बाब गांर्भीयाने घेत नाही. कंपनीवर असलेली कायदेशीर जबाबदारी, कार्यक्षेत्र निश्चित करण्याच्या नावाखाली टाळाटाळ करत आहे.

भविष्यात गंभीर घटना घडल्यास यास कंपनी जबाबदार असेल. त्यावेळी कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येईल. त्यामुळे इंधन टँकर रस्त्यात उभी न करता त्यासाठी योग्य ती पार्किंग करावी अन्यथा रस्त्यावर इंधन टँकर अनधिकृतपणे उभे आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी.

असे दिलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे इंधन टँकर पार्किंगचा विषय आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT