Traffic jam happened here on Tuesday. esakal
नाशिक

Nashik News : अशोकस्तंभाला वाहतूक कोंडीचा विळखा; सकाळ- सायंकाळ वाहनांच्या लांबलचक रांगा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अशोकस्तंभ चौकात वाहतूक कोंडीमुळे सकाळ- सायंकाळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. येथील वाहतूक कोंडीमुळे मेहेर सिग्नल यंत्रणाही कोलमडते. या मार्गावरील वाढलेल्या वाहतुकीला पर्यायी मार्गांची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

द्वारका चौक, मुंबई नाका सर्कल आणि इंदिरानगर बोगदा ही शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडीची ठिकाणे असताना त्यात आणखी अशोकस्तंभ चौकाची भर पडली आहे. (Traffic jam at Ashok Stambha Long queues of vehicles morning evening Nashik News)

काही दिवसांपासून अशोकस्तंभ परिसरात सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीच्या समस्येने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सीबीएस, मेहेर सिग्नल आणि गंगापूर रोडकडून अशोकस्तंभावर वाहतूक येते.

रविवार कारंजाकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक आहे. परंतु, रामवाडीकडे घारपुरे घाटावरून जाणारी आणि येणारी वाहने असतात. तर, वकीलवाडीकडे जाण्यासाठी परवानगी आहे परंतु तिकडून येण्यासाठी नाही.

असे असताना वकीलवाडीकडे जाणारी व येणारी वाहतूक असते. एकूणच, अशोकस्तंभ चौकातून सात रस्ते आहेत. यात रविवार कारंजाचा एकेरी मार्ग वगळता उर्वरित चार मार्गांकडून वाहतूक येते-जाते.

सकाळी गंगापूर व सीबीएसकडे येणाऱ्या शालेय वाहनांसह कामकाजाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्याची गर्दी असते.

तर सायंकाळी शालेय वाहनांसह शहर बस, खासगी वाहनांची गर्दी असते. सकाळपेक्षा सायंकाळी पाच वाजेपासून ते रात्री आठ-साडेआठ वाजेपर्यंत याठिकाणी वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. स्मार्ट रोडवरील वाहतूक थांबविल्यास वाहनांच्या रांगा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचतात.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

घारपुरे घाट ‘जाम’

अशोकस्तंभाकडून घारपुरे घाटमार्गे मखमलाबाद, पेठ रोडकडे वाहने जातात. तर, त्याच मार्गे अशोकस्तंभाकडे वाहने येतात. गोदावरीवरील पुलापासून ते अशोकस्तंभापर्यंतचा रस्ता दुहेरी वाहतुकीचा आहे.

तर, गंगापूर रोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्याकडूनही काही वाहने घारपुरे घाटाकडे येतात. त्यामुळे घारपुरे घाटावर वाहतुकीची कोंडी होते. त्याचा परिणाम अशोकस्तंभापर्यंत घारपुरे घाटातील खोळंबलेल्या वाहनांच्या रांगा येतात. त्यामुळे घारपुरे घाट जाम झाला की त्याचा थेट परिणाम अशोकस्तंभावरील वाहतुकीवर होतो.

वाहतूक पोलिस मेटाकुटीला

वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळ- सायंकाळ याठिकाणी तीन ते चार वाहतूक पोलिस असतात. परंतु, वाहनांची वर्दळ आणि एकावेळी एकापेक्षा अधिक वाहने येत असल्याने ती वाहतूक नियंत्रण करणे वाहतूक पोलिसांना कठीण जाते. त्यातच, सिटीलिंकच्या मोठ्या बस एकापेक्षा अधिक आल्यास वाहतूक कोंडीमध्ये अधिकची भरच पडते.

घारपुरे घाट मार्ग एकेरी गरजेचा

जुन्या गंगापूर नाक्यावरून चोपडा लॉन्समार्गे वाहतुकीचा रस्ता बंद आहे. त्यामुळे त्यामार्गे दिंडोरी, पेठ, मखमलाबाद, पंचवटीकडे जाणारी वाहनेही अशोकस्तंभ मार्गे जातात. त्यामुळे वाहने वाढल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे.

या वाहतुकीला पर्यायी मार्गाची गरज आहे. घारपुरे घाटाचा मार्ग एकेरी करणे गरजेचे आहे. सकाळ आणि सायंकाळी मोठी वाहनांना परवानगी न दिल्यास बराच फरक पडण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे

- चारपेक्षा अधिक रस्त्याने येणारी वाहने

- सिटीलिंकच्या एकापाठोपाठ येणाऱ्या बस

- चौकालगत असलेल्या रिक्षाची अनधिकृत पार्किंग

- घारपुरे घाटाकडे जाणारी-येणारी वाहने

- वकीलवाडीकडे एकेरी वाहतूक असताना येणारी वाहने

- सायंकाळच्या वेळी शालेय वाहनांची गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT