Traffic jam near Nimani bus stand. esakal
नाशिक

Nashik Traffic News : निमाणी बसस्थानकाजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच!

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : अरुंद रस्ता आणि वाढलेली वाहनांची संख्येमुळे जुना आडगाव नाका ते निमाणी या मार्गावरील वाहतूक कोंडी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्याने सेवाकुंज येथे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना वाहने थांबवावे लागत असल्याने या कोंडीत आणखी भर पडली आहे. (Traffic jams near Nimani bus stand Nashik Traffic News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

वाहनांच्या लांबवर रांगा लागत असल्याने पुढे जाण्यासाठी वाहने प्रतीक्षेत थांबलेली असतात. जुना आडगाव नाक्याकडून निमाणी, पंचवटी कारंजा, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, दिंडोरी नाका, पेठ फाटा आदींकडे जाणारी वाहने याच निमाणी मार्गाने येत असतात. हा मार्ग अत्यंत अरुंद आहे.

सिटीलिंक बस, बाजार समितीत शेतमाल घेऊन जाणारी वाहने तसेच शेतमाल खरेदी करून ते मुंबईला घेऊन जाणारी वाहने, शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी वाहने, खासगी वाहने, रिक्षा, दुचाकींची या मार्गाने प्रमाणात वर्दळ असते. आता शाळा सुरू झाल्याने सेवाकुंज येथे विद्यार्थी शाळेत जाताना तसेच शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडताना वाहने थांबविण्याची वेळ येते.

अशावेळी वाहनांची लांबवर रांग लागते. ही कोंडी वाढत थेट निमाणी ते जुना आडगाव नाक्यापर्यंत वाढत असल्याचे दिसते. परिणामी, या गर्दीत अनेकदा अपघात होण्याची शक्यता वाढते. रस्त्यांच्या कडेला थांबविण्यात आलेल्या वाहनांमुळेही या कोंडीत भर पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT