Smart City Work esakal
नाशिक

स्मार्ट कामांमुळे गंगाघाटावरील वाहतूक कोंडी नित्याचीच

दत्ता जाधव

पंचवटी (जि. नाशिक) : गंगाघाटावर सध्या स्मार्ट सिटी (Smart City) अंतर्गत रस्ते व भूमिगत गटारींची (Roads and underground sewers) कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेल्या या ‘स्मार्ट’ कामांमुळे सकाळ व संध्याकाळी वाहतुकीच्या कोंडीमुळे धार्मिक विधीसाठी (Religious Rites) येणाऱ्यांसह स्थानिक व्यावसायिक, नागरिक त्रस्त आहेत. (Traffic jams on Gangaghata are common due to smart City works Nashik News)

शहराच्या अनेक भागात स्मार्ट सिटीची कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यात गोदाघाटावरील भूमिगत गटारींसह विविध कामांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. पावसाळा तोंडावर असून, त्यापूर्वी ही कामे न झाल्यास पुराचे पाणी थेट गटारांत शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे ही कामे त्वरित व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रामकुंडावर पुन्हा खड्डा

मध्यंतरी रामकुंड भागात स्मार्ट सिटीची कामे सुरू होती. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. आता ती कामे संपली तरी नव्याने रामकुंडावर मोठा खड्डा खोदण्यात आलेला आहे. सकाळच्या सुमारास या ठिकाणी विधीसाठी मोठी गर्दी उसळते. अशावेळी बाहेरून आलेल्या भाविकांना वाहने कोठे उभी करायची, असा प्रश्‍न पडतो. हीच स्थिती नारोशंकर मंदिरासमोरही आले. या ठिकाणीही भूमिगत गटारींसाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे, मात्र त्यामुळे स्थानिक व्यावसायिक जेरीस आले आहेत. पावसाळ्यात व्यवसाय बंदच असतात, मात्र लांबलेल्या या कामांमुळे ग्राहक फिरकेनासा झाल्याचे व्यावसायिक सांगतात. गंगाघाटाच्या दुतर्फा फरशा बसविण्याचे काम काही दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होते. परंतु, सध्या हे कामही थांबल्याचे दिसून येते. सध्या गोदापात्राच्या दुतर्फा या फरशा पडून आहेत.

किरकोळ लोखंडासाठी जिवाची बाजी

गंगाघाटावर मोठ्या प्रमाणावर गटारींची कामे सुरू असल्याने या ठिकाणहून जुन्या ढाप्यांमधील लोखंड काढण्यासाठी मद्यपी, गर्दुल्ले यांची मोठी गर्दी उसळत आहे. किरकोळ लोखंडासाठी हे लोक स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे या ठिकाणी आढळून आले. विशेष म्हणजे लोखंड गोळा करण्यास अटकाव केल्यास थेट शिवीगाळ केली जात असल्याचा अनुभव जेसीबी चालकाने व्यक्त केला.

"गंगाघाटावर सुरू असलेली भूमिगत गटारींची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत. सध्या ही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत."

- महेश गोवर्धने, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT