Traffic News esakal
नाशिक

Nashik News : वाहतूक कोंडीची ‘बेटं’ नवीन वर्षातही जैसे थे

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : द्वारका, सारडा सर्कल आणि मुंबई नाका परिसर हा वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरला आहे. नवीन वर्ष उजाडले तरीदेखील येथील वाहतूक कोंडी कमी होताना दिसेना. येथील वाहतूक बेटांचा मोठा आकार वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहेत.

त्यामुळे महापालिकेने वाहतूक बेटांचा आकार कमी करण्यासह रस्त्यांची रुंदी वाढवण्याचे नियोजन करावे आणि त्यायोगे वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Traffic problem is not solved in new year in nashik road of Dwarka Sarda Circle Mumbai Naka Chowk is reason Nashik News)

शहराच्या वाढत्या विकासामुळे वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. विशेषत: द्वारका, सारडा सर्कल आणि मुंबई नाका चौक या भागांत रोजच मोठी वाहतूक कोंडी होत आहे. येथील वाहतूक बेटांचा आकार यास कारणीभूत ठरत आहे.

विशेष करून ट्रक, बस यासारखी मोठी वाहनं वळण घेत असताना वाहतूक कोंडीत अधिक भर पडत असते. याचा त्रास सामान्य नागरिकांना होत असतो. शिवाय अपघातासही निमंत्रण मिळते.

या वाहतूक बेटांचा आकार आणि रस्त्यांवर, तसेच रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. महापालिका आणि पोलीस विभागाकडून याठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्याचा केवळ आव आणला जातो. प्रत्यक्षात कृती मात्र होत नाही.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

गेल्या अनेक वर्षांपासून येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात नियोजन केले जात असल्याचे बोलले जाते. परंतु, परिस्थिती आजही जैसे थे दिसून येत आहे. २०२१मध्ये येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करत विविध प्रकारचे नियोजन केले होते.

ते केवळ कागदावरच राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्ष उजाडले तरी येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही सुटता सुटेना. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

"सारडा सर्कल आणि द्वारका वाहतूक बेटांचा आकार मोठा आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. सारडा सर्कल वाहतूक बेट परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास जाणवतो. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना त्यांचे अपघात होतात. महापालिकेने लक्ष देऊन त्वरित वाहतूक बेटांचा आकार कमी करावा."
नदीम शेख, शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT