railway.jpg 
नाशिक

रेल्वेसेवा 'या' तारखेपर्यंत पूर्णपणे बंदच ठेवण्याचा निर्णय!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार पुढील महिन्यातील या तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णपणे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील दिड महिना देशात मालवाहतूक आणि श्रमिक स्पेशल गाड्या वगळता नियमित रेल्वेगाड्या बंदच राहणार आहेत.

पुढील आदेश येईपर्यंत बंद

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार पुढील महिन्यातील 30 जून मध्यरात्रीपर्यंत भारतीय  रेल्वेच्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णपणे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील दिड महिना देशात मालवाहतूक आणि श्रमिक स्पेशल गाड्या वगळता नियमित रेल्वेगाड्या बंदच राहणार आहेत.देशातील कोणतीही प्रवासी गाडी कुठल्याही  स्थानकावरून तिचा नियमित प्रवास करणार नाही, मेल एक्स्प्रेस, मेमो, सर्व ब्रांच लाइन, दुरंतो एक्सप्रेस, लोकल ट्रेन अशा सगळ्या गाड्यासाठी हा नियम लागू असेल. माल व पार्सल गाड्या फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी कार्यरत असतील. भुसावळ विभागातील सर्व स्थानकांची आरक्षण केंद्रे, अनारक्षित तिकीट केंद्रे, पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. आरक्षित तिकिटाचा परतावा आरक्षण कार्यालयामार्फत होईल आणि हा परतावा पूर्ण दिला जाईल.

आरक्षण परतावा पुढील 6 महिन्यापर्यंत मिळणार

प्रवाशी प्रवासाच्या तारखेपासून 6 महिन्यापर्यंत रद्द केलेल्या गाड्यांची तिकिटे रद्द करण्यासाठी आरक्षण कार्यालयमध्ये आरक्षित तिकिटे सादर करु शकतात. आरक्षण कार्यालय सुरू झाले की प्रवाशांनी तिकीट रद्द करण्याची घाई करू नये. गर्दी होऊन नागरी आरोग्यवर परिणाम होऊ नये म्हणून आरक्षण परतावा पुढील 6 महिन्यापर्यंत मिळणार आहे तर ऑनलाइन तिकीट धारकांचे तिकीट हे ऑनलाइन तिकीट रद्द करावे लागेल आणि परतावा हा बँक खात्यात जमा होईल. 

महत्वाची माहिती 

कोरोना दुष्परिणामांमुळे भारतीय रेल्वेची प्रवासी पूर्णपणे रद्द झाली आहे आणि प्रवाशांना कोणत्याही परिस्थितीत रेल्वे स्थानक परिसरात प्रवेशाची परवानगी नाही. श्रमिक स्पेशल ट्रेन ही विशेष ट्रेन राज्य सरकारच्या विनंतीवरून विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींसाठीच चालविली जाईल पण फक्त राज्य सरकारच्या विनंतीवरून ज्या प्रवाश्याला प्रवास करायचा असेल त्यांनी केवळ राज्य सरकारशी संपर्क साधावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT