mushroom esakal
नाशिक

Sakal Training : उद्यापासून मशरूम शेती व व्यवसायाबाबत प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

Sakal Training : मशरूम शेती हा मुळात बुरशी पिकवण्याचा व्यवसाय आहे. आज मशरूमची लागवड हा भारतातील सर्वात उत्पादक आणि फायदेशीर व्यवसाय आहे.

अल्पावधीत शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फायद्यात रूपांतर करत असल्याने हा व्यवसाय लोकप्रिय होत आहे. (Training on mushroom farming and business from tomorrow nashik news)

मशरूम शेती केवळ पौष्टिक आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही तर निर्यातीसाठीही केली जात आहे. थोड्या जागेत किंवा जमिनीत मशरूम शेती करता येत असल्याने अत्यल्प भूधारक व भूमिहीन देखील एखादी खोली भाड्याने घेऊन ही शेती करू शकतात.

याबाबत लेखी आणि प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण नाशिक येथील ‘सकाळ’ कार्यालयात शनिवारी (ता.२२) व रविवारी (ता.२३) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उत्पादन पद्धती, मागणी व पुरवठा, व्यवसायासाठी अपेक्षित गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर, बँक फायनान्स, प्रोजेक्‍ट रिपोर्ट, उपलब्ध मार्केट, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग आदींविषयी प्रशिक्षणात मार्गदर्शन होईल. सहभागींना एक वर्षाचा टेक्निकल सपोर्ट प्रदान केला जाणार आहे.

प्रतिव्यक्ती शुल्क : दोन हजार पाचशे रूपये.

ठिकाण: ‘सकाळ’ कार्यालय, सातपूर इंडस्ट्रिअल इस्टेट, त्र्यंबक रोड, नाशिक

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : ९२८४७७४३६३.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT