Nashik Rural SP Sachin patil Latest News esakal
नाशिक

खासगी संभाषणात संयम गमावू नका; Social Mediaवरील ‘व्यवहार’ होतोय रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी (जि. नाशिक) : एका महिलेने सोशल प्लॅटफॉर्मरून चांदोरीतील युवकासोबत मैत्री वाढविली. व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. त्यात ती विवस्त्र झाली. त्याचाही संयम ढळला. पुढे हेच रेकॉर्डिंग दाखवून त्याला ती खंडणी मागू लागली. डिजिटल व्यवहार अन् इंटरनेटने क्रांती केल्यानंतर सोशल मीडियाच्या गैरवापरातून खळबळजनक घटना पुढे येत आहेत.

त्यातील ही एक घटना. सद्यःस्थितीत सोशल मीडियाच्या गैरवापराचे अनेक प्रकार दिसून येत असून, नवनव्या गुन्ह्यांची नोंद होत आहे. अनेक जण फारशी माहिती न घेता महिलांशी संभाषण करताना संयम गमावून ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकाराला बळी पडत आहेत.

समोरच्या महिलेशी चॅटिंग, एक पाऊल पुढे जात व्हिडिओ कॉलिंग, त्याचे मग बेमालूमपणे रेकॉर्डिंग होते आणि मग प्रतिष्ठित व्यक्तीला ‘टार्गेट’ केले जाते. इंटरनेट व सोशल मीडिया क्रांतीमुळे सायबर गुन्ह्यातही मोठ्या संख्येने वाढ होत असून, अशी हाताबाहेर गेलेली अनेक प्रकरणे उघडकीस येत असल्याची माहिती मिळत आहे. (Transactions on Social Media are being recorded threat for users nashik cyber crime news)

सेक्सटॉर्शनला बळी पडलेल्या चांदोरीतील युवकाने हिंमत केली आणि सायखेडा पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला; परंतु अनेक जण अशा ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यानंतरही प्रतिष्ठेपायी तक्रार नोंदवत नाहीत. घटना बाहेर उघडकीस येऊन कटकट मागे लागू नये म्हणून महिला किंवा संबंधित गँगला हवे ते देतात. अनेकदा पैशाशिवाय इतरही मागणी केली जात असल्याने कुटुंबच उद्ध्वस्त होण्याची भीती संबंधित युवकाने व्यक्त केली. सोशल मीडियाच्या गैरवापराचे असे अनेक प्रकार आहेत.

सावज कसे हेरले जाते

विविध पोर्टल्सवर व्यक्त होणाऱ्या यूझर्सच्या पोस्टचा नियमित अभ्यास करून सावज हेरले जाते. या सावजाकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून काही टक्केवारी देऊन बेरोजगारांना काम दिले जात आहे. त्यामुळे बेरोजगार तरुण पिढीचे भवितव्यही चुकीच्या दिशेने जात आहे. सामान्य माणसांच्या तुलनेत गुन्हेगारच सोशल मीडियाचा शंभर टक्के वापर करीत असून, फसव्या लिंक्स, फेक कॉलचे जाळे आणखी घट्ट होत आहे. अनेकदा समाजविघातक लेख, प्रचाराचे साहित्यही सोशल मीडियावर दिसून येत आहे; परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सोशल मीडियाच्या वापराबाबत अनेकांचा ‘चलता है’ दृष्टिकोन धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

"सोशल मीडियावरून मैत्री करताना पुढील व्यक्तीसोबत संयमाने वागणे गरजेचे आहे. अनेकदा महिला किंवा पुरुष शॉर्ट टर्म पेशन्समुळे नको त्या नादाला लागतात. पुढील व्यक्ती कदाचित तुमच्याकडे सावज म्हणून पाहत असेल. पुढील व्यक्ती असामाजिक, अश्लील व्हिडिओ पाठवत असेल, अपलोड करीत असेल तर तत्काळ सोशल मीडियावरील ब्लॉक ॲन्ड रिपोर्टचा पर्याय वापरावा." -सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

Saving Scheme : सरकारी हमीची सुरक्षित गुंतवणूक योजना! मिळेल ८२,००० रुपये व्याज आणि १.५ लाखांची करसवलत

जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, प्रलंबित बदली प्रक्रिया लवकरच सुरू होणार, तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार?

Thane Politics: काँग्रेसला जबर धक्का! ११ नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपात दाखल

SCROLL FOR NEXT