Maharashtra Police esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीवर बदल्या

राज्यात ५३९ उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षकपदी बढती देत त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातील १३ जणांचा यात समावेश आहे.

विनोद बेदरकर

नाशिक : राज्यात ५३९ उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षकपदी बढती देत त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातील १३ जणांचा यात समावेश आहे.

बढती तूर्तास तात्पुरत्या स्वरूपात

ही बढती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून शासनाच्या १७ डिसेंबरच्या आदेशानुसार व तूर्तास तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच या केवळ खुल्या गटातील पदोन्नत्या असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या बदल्यांमध्ये नाशिक शहरातील सहा, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलातील सात अशा १३ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील चौघांची नाशिक आयुक्तालयातून नाशिक परिक्षेत्रात बदली झाली आहे. नऊ जणांची इतर जिल्ह्यांत बदली झाली आहे. नाशिक आयुक्तालय तसेच परिक्षेत्रात इतर जिल्ह्यांतून १३ उपनिरीक्षक येणार आहेत. यात सर्वाधिक आठ मुंबईतून, तर उर्वरित जळगाव, नगर व औरंगाबाद जिल्ह्यांतून येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan : व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतात उद्भवू शकते; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ४५ हजार व्याज मिळवा! २०२६ मधील पोस्ट ऑफिसची मालामाल करणार FD योजना, Money Saving नक्की वाचा

Apple ने ज्याच्यावर केस केली त्यानेच लिक केली iPhone Fold ची डिझाइन! उघड केलं कंपनीचं 'हे' मोठं सीक्रेट, जगभर खळबळ

चोरी करायला आला अन् अडकला, शेवटी स्वत:च्या सुटकेसाठी घरमालकाला केली विनंती; VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अजित पवारांचं बैठकीत सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT