boys town english school nashik esakal
नाशिक

Nashik News: बॉईज टाऊनचे हस्‍तांतरण रद्द; दोन्‍ही संस्‍थांनी जारी केले संयुक्‍त निवेदन

पालकांच्‍या वाढत्‍या विरोधातून हा प्रस्‍ताव रद्द करण्यात आला असल्‍याचे समजते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पी. एन. मेहता एज्‍युकेशनल ट्रस्‍ट नाशिक संस्‍था संचलित बॉईज टाऊन इंग्‍लिश हायस्‍कूलच्‍या हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव रद्द करण्यात आला आहे.

पालकांच्‍या वाढत्‍या विरोधातून हा प्रस्‍ताव रद्द करण्यात आला असल्‍याचे समजते. (Transfer of Boys Town cancelled Both organizations issued joint statement Nashik News)

या संदर्भात पी. एन. मेहता एज्‍युकेशनल ट्रस्‍ट आणि शाळा हस्‍तांतरणासाठीची प्रस्‍तावित संस्‍था असलेल्‍या जालना येथील नूपुर शिक्षण संस्‍था यांनी संयुक्‍तरित्‍या निवेदन जारी केले आहे.

या निवेदनानुसार बॉईज टाऊन इंग्‍लिश हायस्‍कूल या अनुदानित माध्यमिक विद्यालयाचे जालना येथील नूपुर शिक्षण संस्‍था यांना हस्‍तांतरण करण्याचे दोन्‍ही संस्‍थांनी ठरविले होते.

परंतु काही अपरिहार्य कारणास्‍तव सदर हस्‍तांतरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेशी निगडित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्व संबंधित यांनी नोंद घ्यावी, असे नमूद केले आहे.

दरम्‍यान दोनच दिवसांपूर्वी प्रकटन प्रसिद्ध करताना हस्‍तांतरणासंदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्‍या. या प्रस्‍तावाला कडाडून विरोध होत असताना कायदेशीर लढाई देण्याची तयारी काही पालकांकडून सुरू झालेली होती.

हरकती नोंदविण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी दिलेला असताना, त्‍याआधीच जाहीर निवेदन जारी करताना हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव स्‍थगित केल्‍याचे संस्‍थांनी जाहीर केले असून, यामुळे पालकांकडून समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT