nashik school stops girl having menstruation from planting trees
nashik school stops girl having menstruation from planting trees  esakal
नाशिक

देवगाव आश्रमशाळेतील ‘त्या’ शिक्षकाची बदली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देवगाव येथील शासकीय कन्या आश्रमशाळेत वृक्षारोपणावरून उठलेल्या वादळानंतर शाळेतील संबंधित शिक्षकाची प्रशासनाकडून प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या आश्रमशाळेत बदली करण्यात आली आहे.

स्थानिकांचा रोष शांत करण्याच्या उद्देशाने ही प्रशासकीय बदली करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. (Transfer of teacher in Devgaon Ashram School for restricting girl student from tree plantation nashik Latest marathi news)

२५ जुलै २०२२ ला देवगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थीनीने आदिवासी अपर आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीत मासिक पाळी आली असल्याचे कारणातून शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याचा आरोप केला होता.

त्याची आदिवासी आयुक्तांनी दखल घेत प्रकल्प अधिकारींना चौकशीअंती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. राज्य महिला आयोगाकडून देखील या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले.

प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी चौकशी करत या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. त्यानंतर या विद्यार्थीनींची ही तक्रार खोटी असल्याचे पुढे आले होते. दरम्यान या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये रोष होता.

संबंधित विद्यार्थिनी ही त्याच शाळेत शिक्षण पूर्ण करणार आहे. भविष्यात पुन्हा कुठलीही अडचण येऊ नये म्हणून विभागाकडून त्या शिक्षकांची देवगाव येथून म्हैसगण येथील शासकीय आश्रमशाळेवर प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT