Prabhakar Jhalke, Narayan Shinde etc. at the inauguration of Dhadpad Manch Holiday Free Children's Library. esakal
नाशिक

Reading Culture : बालगोपाळांसाठी वाचनाचा खजिना खुला; रुजावी वाचन संस्कृती

सकाळ वृत्तसेवा

Reading Culture : वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते. तरुणाईत वाचन संस्कृती रुजावी यासाठी अनेक प्रयत्न होतात, असाच प्रयत्न येथील धडपड मंचने गेल्या २४ वर्षापासून हाती घेतला आहे, तो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत बालगोपालांसाठी मोफत बाल वाचनालयाचा...!

यंदाही वाचनालय आजपासून चिमुकल्यांच्या सेवेत हजर झाले असून येथून अनेक छोटी मोठी पुस्तके चिमुकले घेऊन पूर्ण सुट्टीत वाचू शकणार आहेत. (Treasures of reading open for child shepherds reading culture by dhadpad manch at yeola nashik news)

आजच्या टीव्ही - स्मार्टफोन्सच्या जगात लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी. प्रत्यक्ष पुस्तक निवडून ते हातात धरून वाचण्याचा आनंद काय असतो याचा अनुभव समजावा यासाठी येवल्यातील धडपड मंचतर्फे बालगोपाळांसाठी मोफत बालवाचनालय हा उपक्रम गत २४ वर्षापासून चालवला जात आहे.

ज्येष्ठ पत्रकार रमेश पटेल यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्‌घाटन झाले. पूर्वी आजी-आजोबा आपल्या नातवांना गाणी, गोष्टी सांगायचे, बालगोपाळांना नवनवीन पुस्तके वाचून दाखवायची. सध्या एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चालली आहे.

त्यामुळे कुटुंबाला संस्कार देणारी आजी-आजोबा मंडळी फारशी छोट्या कुटुंबात दिसत नाही. सध्याची विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबा यांचा सहवास नाही व संस्कार देणाऱ्या पुस्तकांची माहितीही कोणी देत नाही. त्यामुळे येथील सेवाभावी संस्था धडपड मंचने पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

१६ एप्रिल ते ३० मे या कालावधीसाठी लहान मुलांसाठी मोफत बालवाचनालय चालवण्यात येणार आहे. पुस्तके मुलांना घरी वाचनासाठी दिली जाणार असून पुन्हा बदलून देखील दिली जाणार आहेत.

याप्रसंगी नारायण शिंदे, श्री. देशपांडे, राजेंद्र आहेर, दत्तात्रय नागडेकर, संजय जोशी,श्रीकांत खंदारे, मयूर पारवे, दत्ता कोटमे, दीपक कासले, गोपी दाणी, मुकेश लचके,अक्षय पारवे, गोपाल गुरगुडे,वरद लचके आदी उपस्थित होते. सर्व वाचक पालक यांनी आपल्या पाल्यांना त्यांच्या मित्रमंडळींसोबत पाठवून या मोफत वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन धडपड मंचचे प्रभाकर झळके यांनी केले. सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले.

"डिजिटल युगात वाचन संस्कृतीचा लोप होत आहे. मुले सुट्टीत खेळण्याच्या आहारी जात असून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचनाचे प्रमाण वाढावे या हेतूने हा उपक्रम राबविला जातो." -प्रभाकर झळके, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT