injection tozi 1.jpg 
नाशिक

घाबरू नका! टॉसिलिझुमॅब इंजेक्‍शनचा जरी तुटवडा; तरी कोरोना उपचारावर परिणाम नाही

अरुण मलाणी

नाशिक : कोरोनारुग्‍णांवर उपचारासाठी वापरल्‍या जाणाऱ्या टॉसिलिझुमॅब इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत असला, तरी उपचारासाठी या इंजेक्‍शनचा फारसा वापर होत नाही. अन्‍य इंजेक्‍शन, तसेच ऑक्‍सिजन थेरपीद्वारे रुग्‍णांवर प्रभावी उपचार केले जात असल्‍याची माहिती अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली. इंजेक्‍शन उपलब्‍धतेअभावी रुग्‍णांच्‍या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. 

रुग्‍णाच्‍या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये : डॉ. सैंदाणे 
डॉ. सैंदाणे म्‍हणाले, की कोरोनाच्‍या उपचारप्रक्रियेत पहिल्‍या टप्प्‍यात वैद्यकीय निरीक्षणाखाली या इंजेक्‍शनचा वापर सुरू होता; परंतु त्यापेक्षा ऑक्‍सिजन थेरपी व अन्‍य पर्यायी इंजेक्‍शन, औषधे प्रभावी ठरत असल्‍याचे निष्कर्ष निघत होते. या संदर्भात संबंधित इंजेक्‍शन उत्‍पादक कंपनीलाही कळविले होते. सद्यःस्‍थितीत अत्‍यवस्‍थ रुग्‍णांवर प्रभावी उपचार सुरू आहेत. टॉसिलिझुमॅब इंजेक्‍शनऐवजी पर्यायांचा वापर केला जातो आहे. त्‍यामुळे रुग्‍णांच्‍या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. या इंजेक्‍शनची सुधारित आवृत्तीदेखील कंपनीतर्फे उपलब्‍ध केली जाणार असल्‍याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.  

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT