Trees were cut down to build petrol pump nashik marathi news 
नाशिक

नव्या पेट्रोल पंपासाठी झाडांचा बळी; पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप

दत्ता जाधव

नाशिक : सध्या या इंधन कंपन्यात नव्याने पेट्रोल पंप सुरु करण्याची जोरदार स्पर्धा आहे. पेट्रोल कंपन्यातील तीव्र स्पर्धेमुळे वाढलेल्या मागणीच्या धर्तीवर शहराच्या चौकाचौकात नव्या पेट्रोल पंपांची सुरवात होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. शासनही त्याबाबत आग्रही आहे. मात्र अशा परिस्थिती पोलिस कल्याण निधीतंर्गत साकारत असलेल्या शरणपूर रोडवरील नव्या पेट्रोल पंपासाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडांचा बळी देण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पर्यावरणप्रेमींची तक्रार

सार्वजनिक क्षेत्रात इंडियन ऑईल्स, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या सरकारच्या मालकीच्या कंपन्यांसह रिलायन्स, इस्सार कंपनीचे पेट्रोल पंप कार्यान्वित आहेत. गंगापूर रोडवरील सरकारवाडा पोलीस ठाण्याशेजारील पोलिस वसाहतीच्या जागेशेजारी पेट्रोल पंप असून तो पोलीस कल्याण निधी योजनेद्वारे चालविला जातो. हा पंप सुरू असतानाच शरणपूर रोडवरील पोलिस कवायत मैदानाच्या एका टोकाला नव्या पेट्रोल पंप उभारण्याचे नियोजन सुरू आहे. नवीन पंप होण्यासाठी कोणाचेही दुमत नाही, परंतु त्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या दोनचार झाडांचा बळी देणे चुकीचे आहे, अशी पर्यावरणप्रेमींची तक्रार आहे. 

हरकती का नाहीत? 

शहरातील दिंडोरी रोड, पेठरोड किंवा गंगापूर रोडवर रस्त्याच्या मधोमध अनेक झाडे असून ती अपघातास कारणीभूत ठरत आहेत, परंतु ती तोडण्यास न्यायालय परवानगी देत नाही, त्यामुळे ही झाडे अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरूनही अद्यापही ‘जैसे थे’च आहेत. याशिवाय दिंडोरी रस्त्यावरील वहाडणे फार्मकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्राचीन वडाचे झाड अनेकांचा बळी घेऊनही तसेच आहे. पेठरोडवरील बाजार समितीलगत असलेल्या वडाच्या झाडानेही अनेक बळी घेतले आहेत. ही झाडे तोडण्यासाठी परिसरातील लोकप्रतिनिधीही प्रयत्नशील असताना ही झाडे अद्यापही टिकून आहेत. दुसरीकडे पूर्ण वाढ झालेली ही झाडे तोडताना कोणीही हरकत नोंदविलेली दिसत नाही. 

पेट्रोल पंप ही काळाची गरज असली तरी नैसर्गिक साधनसामुग्री वाचविणे आपली जबाबदारी आहे. एकीकडे ऑक्सीजनचा तुटवडा जाणवू लागला असताना विकासाच्या नावाखालील झाडांची कत्तल दुर्देवी आहे. - निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT