sakal exclusive
sakal exclusive sakal
नाशिक

Nashik News : नवीन वर्षात आदिवासी विद्यार्थी नवीन गणवेशात; विद्यार्थ्यांच्या खात्यावर ‘DBT’ जमा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन डिसेंबर संपत आला असतानाही आदिवासी आश्रमशाळांमधील दोन लाख विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित राहणार असल्याची ओरड झाल्यानंतर आदिवासी विभागाने तातडीने स्टेशनरीसह गणवेश, मोजे, साहित्य यांचे पैसे ‘डीबीटी’द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरवात केली आहे.

आतापर्यंत तब्बल पावणेदोन लाख विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असून, २५ हजार विद्यार्थ्यांची खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रीक्रियाही सुरू आहे.(Tribal students in new uniforms in new year nashik news)

यामुळे नवीन वर्षात विद्यार्थी नवीन गणवेशात दिसेल. आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९९ शासकीय आश्रमशाळांमधून जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासह वसतिगृहांमध्ये निवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य, नाइट ड्रेस पुरवले जाते.

पूर्वी हे साहित्य विभागाकडून त्याचे वाटप होत होते. यातील वाढत्या तक्रारींवर आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा (डीबीटी) करण्याचा निर्णय झाला होता. परंतु ‘डीबीटी’तील उणिवा मांडत त्या विरोधात आमदारांनी तक्रारी करत, थेट ‘डीबीटी’ योजना रद्द करण्याची मागणी केली.

त्यावर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ३१ जुलैला ‘डीबीटी’ योजनेतून गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामग्री वगळण्याचा निर्णय घेतला. सरकारने या साहित्य खरेदीसाठी प्रत्येक वर्गनिहाय खर्च निश्चित केला असून, या वर्षी ठरवल्यानुसार विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे प्रत्येकी चार हजार रुपये दिले जाणार असून, उर्वरित रक्कम साहित्य खरेदीसाठी वापरली जाणार होती.

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य पुरवण्यासाठी एकाच वेळी २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांसाठी मिळून १५० कोटींची खरेदी होणार होती. त्यातील ३७.७९ कोटी रुपयांच्या निधीतून शैक्षणिक साहित्य किट खरेदीची निविदा आदिवासी विभागाने प्रसिद्ध केली. मात्र, या निविदेची प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यास फेब्रुवारी उजडणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पुरवठा होण्यास मार्च उजाडणार होता.

त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ते मिळणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे शासनाने आता शैक्षणिक साहित्य किट खरेदीची ३८ कोटींची निविदा रद्द करत विभागाला दणका दिला. तसेच साहित्यांचे पैसे विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानंतर साहित्यासह गणवेश, मोजे, नाइट ड्रेस यांचे सर्वच पैसे ‘डीबीटी’द्वारे देण्याचा निर्णय होऊन ते वर्ग करण्यास सुरवात झाली.

''एकूण एक लाख ९९ हजार विद्यार्थ्यांपैकी एक लाख ७२ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर ‘डीबीडी’ची रक्कम जमा झालेली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या खात्यावर ६० टक्के रक्कम जमा झालेली आहे. ४० टक्के रक्कम जमा करण्याची प्रक्रीया सुरू आहे. आठवडाभरात सर्व पैसे जमा होती.''- संतोष ठुबे, उपायुक्त, शिक्षण आदिवासी विकास विभाग

असे मिळतात पैसे

पहिली ते चौथी विद्यार्थी : ७ हजार ५००

पाचवी ते आठवी विद्यार्थी : ८ हजार ५००

नववी ते बारावी विद्यार्थी : ९ हजार ५००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT