woman farm.jpg
woman farm.jpg 
नाशिक

प्रगतशील महिला शेतकरी बनण्यासाठी 'ती'ची धडपड...कंबर खोचून सदैव तयार!

भाऊसाहेब गोसावी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / चांदवड : आम्हालाही शेतीत भरारी घ्यायचीय... आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करायची... आता आम्ही प्रगतशील शेतकरी व्हनार... असे म्हणत हजार लोकसंख्या असलेल्या जांबुटके (ता. चांदवड) या पूर्ण आदिवासी गावातील 25 महिलांनी शेतीशाळेत सहभाग घेत आधुनिक शेतीचे धडे गिरविण्यास सुरूवात केली. 

शेती करण्याचा पाया रचण्यास सुरूवात

जंगलात भटकंती आणि मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा, असा जांबुटके येथील आदिवासी समाजातील लोकांचा दिनक्रम. त्यातच पारंपरिक पद्धतीने इथले आदिवासी शेती करतात. त्यामुळे आधुनिक शेती करायची कशी याचे साधे ज्ञान देखील त्यांच्याकडे नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर समाजातील शेतकरी जशी प्रगत शेती करतात तशीच आपणही करावी, असं नेहमीच इथल्या महिलांना वाटायचं. आपणही शेतीत नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पादन घ्यावं, अशा विचारात त्या नेहमीच असायच्या. मात्र "चूल, मूल अन्‌ मोलमजुरी' यातून काही सपटका होत नव्हती. अशातच कृषी सहाय्यक चंद्रकला पगार यांनी शेतीशाळेच्या माध्यमातून येथील आदिवासी शेतकरी महिलांना एकत्र आणून त्यांना आधुनिक शेतीचे धडे दिले आणि येथूनच या महिलांना आधुनिक शेती करण्याचा पाया रचण्यास सुरूवात केली.

जीवनमान प्रगत करण्याबाबतही मार्गदर्शन

या शेतीशाळेत गावातील पंचवीस आदिवासी महिलांनी सहभाग घेऊन आधुनिक शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळविले. या महिलांची निर्णयक्षमता वाढविण्यासाठी चांदवड तालुक्‍यात कृषी विभागाने शेतीशाळा घेत त्यांना महिलांचा शेतीमध्ये निर्णायक सहभाग, मातीपरीक्षण, पाणीपरीक्षण, बीजप्रक्रिया याविषयीचे मार्गदर्शनही केले. त्यांच्या गावात मका, सोयाबीन, टोमॅटो, कांदा अशी पिके पारंपरिक पद्धतीने करतात. या महिलांना या पिकांसह शेतीत आधुनिक प्रयोग करणे, प्रगत शेतीतून या आदिवासी महिलांना आपले जीवनमान प्रगत करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. 

घरचे सांगतील तसंच काम आम्ही शेतीत करायचो. आता आम्हालाही वाटतं आपण शेतीत प्रगती करून श्रीमंती गाठावी. यासाठीच आम्ही शेतीशाळेत शिकून तयार आहोत. आम्हाला अजून मार्गदर्शनाची गरज आहे. - रेणूका चौधरी, आदिवासी महिला शेतकरी 

जांबुटके गाव आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याकारणाने शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोचवून शेतीचा व गावाचा विकास घडवून आणणे, हा या शेतीशाळेचा उद्देश होय. - चंद्रकला पगार, कृषी सहाय्यक, शिवरे 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्या सूचनेनुसार आदिवासी महिलांना शेतीत समृद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- राजेंद्र साळुंखे (तालुका कृषी अधिकारी, चांदवड) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT