Tribals are migrating for employment in surgana taluka  
नाशिक

आदिवासींच्या स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणावर गंडांतर! आदिवासी बांधव रोजगारासाठी सासुरवाडीला

हिरामण चौधरी

पळसन (जि. नाशिक) : सुरगाणा तालुक्यातील आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असल्याने त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुरगाणा तालुक्यातील १६८ महसुली गावे आहेत. वाड्या-पाड्या तीनशेच्या आसपास आहेत. या सर्व गावातून स्थलांतर झाल्याचे चित्र आहे. पळसन, भवाडा, बा-हे, उंबरठाण, बर्डीपाडा, बोरगाव, ठाणगाव, जाहुले, मनखेड, पिंपळचोड, गोंदुणे, खुटविहीर, वांगण, अंबाठा, काठिपाडा, उबरदे, खोबळा, लाडगाव, बुबळी आधी गावात आदिवासी समाज वास्तव करतो. त्यांचा मुख्य व्यवसाय भात शेती आहे मात्र भात शेतीवर उपजीविका होत नसल्याने त्यांना रोजगारासाठी स्थलांतर (व्हावे) करावे लागते.

 सासारी जाण्याशिवाय पर्यायच नाही

सुरगाणा तालुका हे आदिवासीचे त्याचे माहेरघर समजले जाते तर दिंडोरी पिंपळगाव, निफाड, लासलगाव, नाशिक, चांदवड हे आदिवासींचे सासर समजले जाते. म्हणून सासरवाडीला रोजगारासाठी जाण्याशिवाय पर्याय नसतो काही आदिवासींच्या शेतजमिनी फॉरेस्ट प्लाट आहेत परंतु या जमिनीतून वर्षाकाठी पाण्याअभावी एकदाच पीक घेतले जाते या थोडेफार धान्य उपलब्ध होत असल्याने माहेरी अपेक्षेप्रमाणे काम मिळत नसल्याने या आदिवासींना सासुरवाडीला स्थलांतर करावे लागते.

मुलांचे शैक्षणिक नुकसान

अतिदृष्टीमुळे भात शेतीचे नुकसान झाल्याने येथील आदिवासींना मोलमजुरीसाठी दिंडोरी, निफाड, चांदवड, पिंपळगाव, नाशिक, व शेजारच्या गुजरात राज्यामध्ये जावे लागते शासनाकडून रोजगार हमीची कामे निघाली तर तरी रोजगार हमीवर पगारकमी अशी अवस्था असते, त्यामुळे नागरिकांचे या कामाकडे दुर्लक्ष होते स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, लहान बालके अंगणवाडी आहारापासून वंचित राहतात येथील ग्रामीण भागातील सर्वात मुले सर्वात जास्त अशिक्षित आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाने सुरगाणा तालुक्यातील आदिवासींना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा व परवडेल अशी मंजुरी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे . 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT