Alok Shingare esakal
नाशिक

Nashik Crime News : आश्रमातीलच कुणीतरी केला आलोकचा खून; पण ठोस पुरावे नाहीत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथील आधारतीर्थ आश्रमातील साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याच्या घटनेप्रकरणाचा तपास करताना ग्रामीण पोलिसांचे कौशल्य पणाला लागले आहे. आश्रमातील असलेल्यांपैकीच कोणीतरी सदरचा प्रकार केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस पोहोचले आहेत. परंतु, नेमके कोणी व का याबाबत पोलिस ठोस धागेदोऱ्यांचा शोध घेत आहेत.

आश्रमात असलेल्या मुलांपैकीच एकाने सदरचे कृत्य केले असून, प्रकरण संवेदनशिल असल्याने पोलिस अधिकारी याठिकाणी तळ ठोकून आहेत. दरम्यान, चिमुकल्या आलोक याच्यावर रात्री उशिरा तळेगाव स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी त्र्यंबक पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (trimbakeshwar adhartirth orphanage murder case Someone in ashram killed Alok no concrete evidence to police Nashik Latest Crime News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

या आश्रमात आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसह १३० अनाथ मुले-मुली राहतात. तेथे मंगळवारी (ता. २२) सकाळी आलोक त्याच्या खोलीच्या बाहेर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला होता. शवविच्छेदनामध्ये त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २३) सकाळी पुन्हा आधारतीर्थ आश्रम गाठून कसून चौकशीला सुरुवात केली. आश्रमाचे चालक, कर्मचाऱ्यांसह विद्यर्थ्यांकडे या प्रकरणी चौकशी करीत धागेदोरे शेाधण्याचा प्रयत्न केला. एक-दोन दिवसात प्रकरणाची उकल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT