trimbak nagradhyakh.jpg
trimbak nagradhyakh.jpg 
नाशिक

BREAKING :त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षांची दिवसाढवळ्या हत्या; मारेकरी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर, राजकीय वर्तुळात खळबळ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा चिरून हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हत्येच्या घटनेनंतर मारेकरी तरूण स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला.

रक्ताच्या थारोळ्यात धनंजय तुंगार; राजकीय वर्तुळात खळबळ 

तुंगार यांचे मोठे भाऊ शेखर यांच्या बाराव्याचे श्राद्ध विधी सुरू असताना धनंजय तुंगार यांना फोन आला. त्यामुळे ते अहिल्या धरणाकडे गेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यावर सुरीने वार करून हत्या केली. धनंजय हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेनंतर आरोपी हा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले​

सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या तुंगार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सध्या ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांनी दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT