Trimbakeshwar Temple esakal
नाशिक

Nashik Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये भाविकांना पहाटे 5 पासून दर्शन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Trimbakeshwar Temple : येथील ज्योतिर्लिंग मंदिरात गुरुवारपासून (ता. १७) सुरु होत असलेल्या श्रावणानिमित्त मंदिर विश्‍वस्त मंडळातर्फे भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार श्रावणात दररोज पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत, तर श्रावणी सोमवारी पहाटे चार ते रात्री नऊपर्यंत मंदिरात दर्शनाची व्यवस्था असेल. (Trimbakeshwar Jyotirlinga Temple Darshan to devotees from 5 in morning nashik news)

नीज श्रावण मासारंभासोबत महाराष्ट्र आणि इतर राज्यातील शिवभक्तांची पावले त्र्यंबकेश्‍वरकडे वळू लागतात. बुधवारपर्यंतच्या (ता. १६) अधिक मासानिमित्त दर्शन, पूजाविधीसाठी देशभरातील भाविकांची गर्दी झाली होती. भाद्रपद मासारंभ १६ सप्टेंबरला होत असून तोपर्यंत शहरामध्ये गर्दी असेल.

भाविकांना पूर्व दरवाजातून, तर देणगी दर्शन रांगेतून उत्तर दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. पूर्व दरवाजातून भाविकांना दर्शनाचा त्रास होऊ नये म्हणून वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दर्शन रांगेत ज्येष्ठांना बसण्याची, स्तनदा मातांना हिरकणी कक्षाची, पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्राथमिक आरोग्य कक्ष अशा सुविधा असतील.

स्थानिकांना स्थानिक रहिवाशांच्या ओळखपत्राच्या आधारे उत्तर महाद्वारमधून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. स्थानिक मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यावर सकाळी साडेदहापर्यंत आणि सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत व्यवस्था केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake: नाशिकमध्ये हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंप, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

SCROLL FOR NEXT