A fire broke out in a truck parked in Udyog Bhavan area 
नाशिक

Fire Accident: केमिकलचे ड्रम असलेल्या ट्रकला आग; सिन्नर येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

Fire Accident : येथील सिन्नर नाशिक महामार्गावरील उद्योग भवन परिसरात साईवेज ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या गोडाऊनमध्ये उभ्या असलेल्या केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. (truck full of chemical drums caught fire suddenly nashik news)

शनिवारी (ता.१८) दुपारी दीडला हा प्रकार घडला. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

सिन्नर-नाशिक महामार्गालगत उद्योगभवनमध्ये साईवेज ट्रान्स्पोर्ट कंपनी असून इमारतीच्या पाठीमागे कंपनीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये संदीप भरत गुळे यांची ट्रक (एमएच १५ एजी ०५६९) उभी होती. या ट्रकमध्ये केमिकलने भरलेले काही ड्रम ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी दीडला ड्रममधील केमिकलने अचानक पेट घेतला आणि बघता बघता ही आग सर्वत्र पसरली.

ट्रकमधून धुराचे लोळ उठू लागल्याने तत्काळ येथील नागरिकांनी सिन्नर नगरपरिषदेच्या व एमआयडीसी अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. त्यानंतर सिन्नर आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोचत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत संपूर्ण ट्रक खाक झाला.

सिन्नर अग्निशमन दलाचे फायरमन नवनाथ जोंधळे, सागर डावरे, आकाश देवकर, लक्ष्मण सोनकुसरे यांच्यासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती

SCROLL FOR NEXT