Twelve quintals of onions were stolen at Wakhari nashik marathi news 
नाशिक

शेतकऱ्यांवर पुन्हा कांदे राखण्याची वेळ! वाखारीत बारा क्विंटल कांद्याची चोरी 

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : वाखारी (ता. देवळा) येथील शेतकरी दिलीप कचरू भदाणे यांच्या शेतातून १० ते १२ क्विंटल लाल कांद्याची सोमवारी (ता. २८) रात्री चोरी झाल्याने दिवसभर काम करून रात्री पुन्हा कांदे राखण्याची वेळ आली आहे. या चोरीमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. 

वाखारी येथील शेतकरी दिलीप भदाणे यांनी आपल्या शेतात जवळपास १० ते १२ क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी तयार करून ठेवला होता. सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी तो चोरून नेला. याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

विक्रीसाठी बाजारात नेण्याचे होते नियोजन

भदाणे यांनी लाल कांद्याचे महागडे रोप आणून कांद्याची लागवड केली होती. नफा नाहीतर खर्च तरी वसूल होईल या आशेने मोठ्या कष्टाने कांदा तयार केला. कांद्याला कलर येईल म्हणून दोन दिवस पातीमध्ये ठेवला होता. मंगळवारी (ता. २९) तो कांदा विक्रीसाठी मार्केटला नेण्याचे नियोजन होते. मात्र चोरट्यांनी यावर डल्ला मारल्याने शेतकरी भदाणे यांचे सुमारे २० ते २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. याआधी तालुक्यात उन्हाळ कांदाचोरीच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा लाल कांद्याची चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

Viral News : शेतकऱ्याचं नशीब एका क्षणात बदललं! विमानतळाला जमीन दिली, १५ कोटी मिळाले… आता स्वत:च्या हेलिकॉप्टरमधून थेट थायलंडला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये गारपीटीसह मुसळधार पावसाला सुरुवात

Sindhudurg Road : रस्ता नको; पण एसटी बस हवी! कुसूरमध्ये संताप, विद्यार्थ्यांची पायपीट

जेएनपीए ते सफाळे ५ तासात पूर्ण होणार, मालवाहतुकीला गती मिळणार; पहिल्या इलेक्ट्रिक इंजिनचा मोठा फायदा, चाचणी यशस्वी

SCROLL FOR NEXT