coronavirus.jpg 
नाशिक

दिलासादायक! नाशिकचे २५ रिपोर्ट निगेटिव्ह...पण मालेगावात मात्र धोक्याची घंटा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूने अखेर नाशिक जिल्ह्यात पाय पसरायला सुरवात केली असून सद्या कोरोनाचा केंद्रबिंदू मालेगाव ठरतो आहे, सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव येथे दाखल 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत, त्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 10 रुग्णह हे मालेगावातील आहेत. तर यातील एकाचा मृत्यूही झाला आहे, दरम्यान, नाशिकच्या गोविंदनगर भागात निष्पन्न झालेल्या पॉझिटिव्ह रुग्नामुळे बाधा वाढण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त आल्यामुळे आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे, 

गोविंदनगरचे 25 रिपोर्ट निगेटिव्ह : पहिल्या पॉझिटिव्हचा रिपोर्ट प्रलंबित 
नाशिक जिल्हयात कोरोना विषाणूचे रुग्ण दुहेरी आकड्यात गेल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, विशेषतः मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णाचे कोरोना रिपोर्ट सलग दोन दिवसात पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे येथील कोरोनाबाधित रुग्नांची संख्या 10 वर तर त्यापूर्वीचे दोन यामुळे हि संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे. 
गुरुवारी (ता, 9) मध्यरात्री जिल्हा रुग्णालयास 36 रिपोर्ट प्राप्त झाले होते, त्यापैकी मालेगावचे आणखी 5 रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. यामध्ये मालेगावातील चार आणि एक चांदवडच्या रहिवाशी आहे, मालेगावच्या चौघांपैकी दोघेजण हे दिल्लीच्या तबलीकी जमातीच्या मरकज संमेलनात सामील झाल्याचे समोर आले आहे, तर, पाचवा कोरोनाबाधित हा चांदवडचा असून तो चांदवड टोलनाक्यावर कामाला आहे, मालेगाव सामान्य रुग्णलयात दाखल होण्यापूर्वी त्याने चांदवड येथे खासजी डॉक्टरकडे गेला होता. मालेगाव रुग्णलयात दाखल कोरोनाबाधितांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, 
तर, त्यापूर्वीच्या 5 कोरोनाबाधित्यांच्या संपर्कातील 6 जण आणि गोविंदनगरमधील 25 जण असे 31 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत, या रिपोर्टमुळे मालेगावचा धोका वाढला आहे तर, नाशिकच्या गोविंदनगरमधील 25 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने महापालिका आरोग्य विभागाचा जीव भांड्यात पडला आहे, 

संशयितांची संख्या वाढणार..मालेगाव बनतेय कोरोनाचे हॉटस्पॉट 
दरम्यान, मालेगाव सामान्य रुग्णालयातील काही कर्मचाऱ्याचे स्वबचे नमुने घेण्यात आले आलेत, तसेच मालेगावत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने त्यांच्या संपर्कातील संशयीतांचीही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे, तसेच, चांदवडमधील एक कोरोनाबाधित असल्याने तेथीलही संशयित वाढले आहेत, त्यामुळे येत्या काही हि संख्या शंभरी पार जाण्याचीही शक्यता आहे, 

हेही वाचा > #Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!

तो रिपोर्ट प्रलंबित
जिल्ह्यात पहिला कोरोनाबधित सापडलेला लासळगावचा युवकाचे 14व्या दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्याच्या 15व्या दिवसाचे नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत, मात्र अद्याप ते प्राप्त झालेले नाहीत. या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. 

हेही वाचा > "कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण

सध्याची स्थिती 
कोरोनाबाधित : 12
कोरोनामुळे मृत्यू : 1
रिपोर्ट प्रलंबित : 58 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT