twins ssc marks.jpg 
नाशिक

आश्चर्यच...जुळ्यांचे गुणही जुळेच! दहावीच्या परीक्षेतही "जुडवा" स्टाईल कायम

ज्योती देवरे

नाशिक : तुम्ही अभिनेता सलमान खान आणि वरुण धवनचा जुडवा बघितलाच असेल. त्यात एकाला मारलं तर दुसऱ्याला लागत असतं. पण नाशिकमधील दोन जुळ्या भावंडांनी दहावीत सेम टू सेम मार्क मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे

‘महाराष्ट बुक ऑफ रेकार्ड’मध्ये नोंद

या जुळ्या भावंडांची जुळी कामगिरी बघून त्यांच्या नातेवाईक आणि गावकऱ्यांनाच फक्त आश्चर्याचा धक्का बसला असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला अश्चर्याचा धक्का बसला आहे. जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात, नाशिकमध्ये दोन जुळ्या भावंडांना नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहे. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्ट बुक ऑफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. शहरातील बॉइज टाऊन शाळेत जाणारे ओम आणि शिवानी बिरारी हे जुळे भावंडे. त्यांना दहावीच्या परीक्षेत ८२.२० टक्के गुण मिळाले आहे. त्यामुळे साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दहावीच्या परीक्षेत या दोघांना प्रत्येक विषयात मिळालेले गुण कमी अधिक असले तरी दोघांच्या गुणांची बेरीज मात्र ५०० पैकी ४४१ आल्याने दोघांना एकूण ८२.२० टक्के गुण मिळाले आहेत.

मार्कही जुळेच असल्याने हा चर्चेचा विषय

जुळ्या मुला-मुलींच्या बाबतीत अशाप्रकारे मार्कही जुळेच असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ओम आणि शिवानी यांचा जन्म १ मे २००४ रोजीचा. दोघेही अभ्यासात हुशारच. अर्थात, ते जुळे भावंडं असले तरी एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने त्यांच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत.ओमला संरक्षण क्षेत्रात जायचे असून, शिवानीला मात्र वैद्यकीय क्षेत्राकडे कल आहे.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT