नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली असून, घरीच विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरात कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. नागरिकांनी घरीच बाप्पाची आरती करून मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने विसर्जनासाठी ऑनलाइन टाइम स्लॉटवर नोंदणी सुरू केली आहे. त्यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?
महापालिकेकडून २४८५.५ किलो अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे आठ दिवसांत सहा विभागांत दोन हजार ५३१ मूर्तिदान स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत, तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून एक हजार ६६ नागरिकांना महापालिकेकडून २४८५.५ किलो अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले. पूर्व विभागात १५७, पश्चिम विभागात १५५, पंचवटी विभागात ८३८, नाशिक रोड विभागात ४१९ मूर्ती प्राप्त झाल्या. महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांत अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्व विभागात ६५ नागरिकांना २०३.५ किलो, पश्चिम विभागातील ६७ नागरिकांना १८९ किलो, पंचवटी विभागातील २६१ नागरिकांना ३८१ किलो, नाशिक रोड विभागातील ४२२ नागरिकांना एक हजार ५५ किलो, सिडको विभागातील १५५ नागरिकांना ३४७ किलो, सातपूर विभागातील ९६ नागरिकांना ३१० किलो अमोनियम बायकार्बोनेट वाटप करण्यात आले.
हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा
संपादन : रमेश चौधरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.