मालेगाव (जि.नाशिक) : गेल्या दोन महिन्यांत उपनिरीक्षक, एक पोलिस शिपाई यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. मनमाड येथेही हवालदाराला लाच घेताना अटक झाली. गेल्या दोन महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार कारवाया केल्या.
महापालिका वर्तुळात खळबळ
तक्रारदाराला मेडिकल दुकान सुरू करण्यासाठी त्या जागेवर कराची थकबाकी नसल्याचे ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्र हवे होते. संबंधित दुकानदाराकडे लिपिक गागडा यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. मंगळवारी महापालिका नगरसचिव कार्यालयात तीन हजार रुपयांची लाच घेताना सोनवणे व गागडा यांना अटक करण्यात आली. महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४ चे प्रभाग अधिकारी तथा प्रभारी नगरसचिव पंकज सोनवणे (वय ४०) यांच्यासह महापालिका लिपिक हिरालाल गागडा (४५) या दोघांना तीन हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने मंगळवारी (ता. ५) अटक केली.
हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड
लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाची कारवाई
मेडिकल दुकानाची कर थकबाकी असल्याने ना हरकत दाखला देण्यासाठी लाच स्वीकारताना दोघे संशयित मिळून आले. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे, दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मृदुला नाईक, किरण रासकर, हवालदार कुशारे, गोसावी, मोरे आदींनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यापूर्वी गेल्या दोन महिन्यांत उपनिरीक्षक, एक पोलिस शिपाई यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. मनमाड येथेही हवालदाराला लाच घेताना अटक झाली. गेल्या दोन महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार कारवाया केल्या.
हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.