corona second patient.jpg 
नाशिक

आश्चर्यंच! चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे चांगलेच कंबरडे मोडले असताना रुग्णांना पॉझिटिव्ह ठरविणारे अहवाल सदोष असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे रुग्णांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. चोवीस तासांत एकाच लॅबोरेटरीतील परस्परविसंगत आणि तितक्याच धक्कादायक अहवालामुळे रुग्णांची मात्र पाचावर धारण बसली आहे. दस्तुरखुद्द रुग्णानेच ‘सकाळ’शी बोलताना आपबीती कथन केली. 

रुग्णाने "सकाळला" सांगितली आपबिती

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सामान्य नागरिक हैराण असताना त्यांचे वैद्यकीय अहवाल निर्दोष येत नसल्याचे चित्र आहे. आदल्या दिवशी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णाचाच दुसऱ्या दिवशी चक्क निगेटिव्ह रिपोर्ट आला.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे खासगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे चांगलेच कंबरडे मोडले असताना रुग्णांना पॉझिटिव्ह ठरविणारे अहवाल सदोष असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे रुग्णांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. शहरातील दातार कॅन्सर जेनेटिक्स या नामांकित पॅथॉलॉजीच्या अहवालात हे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांची चांगलीच तारांबळ उडाली. पाईइपलाइन रोड परिसरात राहणारे नारायण शेळके एका खासगी वाहनावर चालक असून, कोरोनाच्या संशयाने त्यांनी अंबड औद्योगिक वसाहतीतील नामांकित दातार कॅन्सर जेनेटिक्समध्ये ८ सप्टेंबरला तपासणी केली. त्या दिवशी त्यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. त्यामुळे कुटुंबीयांची चांगलीच धांदल उडाली. त्यांच्या जवळच्या नातेवाईक- मित्रपरिवाराला धक्का बसला.

पॅथॉलॉजीचा तांत्रिक चूक झाल्याचा कबूलनामा 

खासगी रुग्णालयात उपचाराची ऐपत नसल्याने कुठल्या सरकारी रुग्णालयात ॲडमिट व्हायचे याची तयारी सुरू असतानाच, रात्रभर या कुटुंबाने जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल होण्याची तयारी सुरू असतानाच, त्याच पॅथॉलॉजीमधून दुसरा रिपोर्ट प्राप्त झाला, जो रिपोर्ट चक्क निगेटिव्ह होता. त्यामुळे या कुटुंबाचा आणखी गोंधळ उडाला. निगेटिव्ह असल्याचा आनंदही झाला. त्यामुळे खरा रिपोर्ट कोणता याची पॅथॉलॉजीकडे शहानिशा करण्यासाठी गेले. त्यावर पॅथॉलॉजीने तांत्रिक चूक झाल्याचे कबूल करून माफी मागितली. पण यानिमित्ताने दोन वेगवेगळ्या अहवालांमुळे कुटुंबाची मात्र चांगलीच फरपट झाली. 


माझा कोरोनाचा रिपोर्ट पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आला. या गोंधळामुळे मनस्ताप झाला. तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला. कोरोना पॉझिटिव्ह म्हटल्यावर काय बितते यांना कसे सांगणार? -नारायण शेळके, तक्रारदार, वाहनचालक 


रोज आमच्याकडे अडीच हजार कोरोनाच्या तपासण्या होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यातून एखादी अशी घटना घडणे स्वाभाविक आहे; परंतु त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. ही तांत्रिक चूक होती हे आम्ही मान्य करतो. -राजन दातार, संचालक, दातार कॅन्सर जेनेटिक सेंटर, अंबड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corporator Daughter: भाजप नगरसेविकेच्या २३ वर्षीय मुलीने संपवले आयुष्य, परीक्षेच्या आदल्या दिवशी उचलले टोकाचे पाऊल

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

Hockey World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान १६ वर्षांनी आमने-सामने! दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो' सामना, कुठे अन् कधी पाहाणार?

Ambajogai News : धानोरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने संपविले जीवन; मुलींची छेड काढल्याच्या संशयातून झाली होती मारहाण

Yogi Adityanath यांच्याकडून नाना पाटेकरांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'प्रसिद्धी न करता शेतकऱ्यांसाठी मदत करणारी पहिली व्यक्ती...'

SCROLL FOR NEXT