manmad acc 1.jpg
manmad acc 1.jpg 
नाशिक

देव तारी त्याला कोण मारी! ट्रक-कारच्या विचित्र अपघातात चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले; मात्र दोन ठार

अमोल खरे

मनमाड (जि.नाशिक) : मंगळवारी (ता. १२) दुपारी मनमाडच्या दिशेने इंदूर-पुणे महामार्गावर येणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार व दुचाकीवर कलंडला. पण देव तारी त्याला कोण मारी...कारमधील चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले.नेमकी कशी घडली घटना...

देव तारी त्याला कोण मारी;कारमधील चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले.
मंगळवारी (ता. १२) दुपारी मनमाडच्या दिशेने इंदूर-पुणे महामार्गावर येणारा ट्रक कॅम्प भागातील बेथेल चर्चजवळ असलेल्या गतिरोधकावर आला असता, चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार व दुचाकीवर कलंडला. या अपघातात दुचाकीवरील रवींद्र गोडसे (रा. अनकवाडे), प्रवीण सोनावणे हे दोघे जण ट्रक खाली येत जागीच ठार झाले. कारमध्ये असलेले चार जणांनी प्रसंगावधान राखत बाजूला पळल्यामुळे बचावले. ट्रकचालक व क्लिनर जखमी झाले असून, त्यांच्यावर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघतानंतर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.  

दुचाकीवरील दोन जण जागीच ठार

इंदूर-पुणे महामार्गावर कॅम्प भागात बेथल चर्चसमोर ट्रक, कार व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघतात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले, तर ट्रकचालक व क्लिनर जखमी झाले असून, कारमधील चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT