Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : 3 तलवारी, 4 कोयते बाळगणाऱ्या दोघांना म्हाडा कॉलनी परिसरातून अटक

नरेश हाळणोर

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून अंबड, सिडको परिसरामध्ये कोयते बाळगून दहशत माजविण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. तर काही घटनांमध्ये कोयत्याने मारून जखमी केल्याच्या घटनाही घडल्या.

अशा टवाळखोरांवर कारवाई करताना अंबडच्या म्हाडा कॉलनी परिसरातून दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून धारदार तीन तलवारी व चार कोयते जप्त केले आहेत. (Two persons carrying 3 swords 4 knives arrested from Mhada Colony area Nashik Crime News)

गोपाल दिलीप डुगलज (१९, रा. एकविरा मेडिकलच्या मागे, म्हाडा कॉलनी, अंबड), प्रवीण उत्तमराव गायकवाड (१९, रा. साईबाबा मंदिराजवळ, पंडितनगर, सिडको) असे दोघा संशयितांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सिडको, अंबड परिसरात टवाळखोरांकडून रात्रीच्या वेळी तलवारी, कोयते घेऊन परिसरामध्ये दहशत माजविण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी गुन्हेशोध पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानुसार, शोध सुरू असतानाच, पोलीस अंमलदार समाधान शिंदे, जनार्दन ढाकणे यांना संशयितांची खबर मिळाली होती. त्यानुसार, गुन्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक वसंत खतेले, मुकेश गांगुर्डे, सचिन करंजे, तुषार देसले, प्रवीण राठोड, घनशाम भोये, अनिल ढेरंगे, दीपक जगताप, संदीप भुरे, वाघ यांनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांनी तीन तलवारी, चार कोयते म्हाडा कॉलनीतील म्हसोबा मंदिरामागे लपवून ठेवल्या होत्या. त्या हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार रवींद्र पानसरे, दीपक शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT