yeola crime 123.jpg 
नाशिक

उसाच्या शेतात लपलेल्या चोरट्यांना घेराव घालून जेरबंद; ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना ग्रामीण पोलिसाच्या पथकाला दोन संशयित वेगवेगळ्या दुचाकीवर येवल्याच्या दिशेने जात असताना दिसले. दोन्ही दुचाकीच्या मागील व पुढील नंबरप्लेट वाकवलेल्या असल्याने गस्तीवरील पोलिसांना संशय आला.

अवघ्या पाच तासांत जेरबंद

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना ग्रामीण पोलिसांचे विशेष पोलिस निरीक्षक बर्डीकर, पोलिस हवालदार रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल यांच्या पथकाला दोन संशयित वेगवेगळ्या दुचाकीवर येवल्याच्या दिशेने जात असताना दिसले. दोन्ही दुचाकीच्या मागील व पुढील नंबरप्लेट वाकवलेल्या असल्याने गस्तीवरील पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्या दोघांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी दुचाकीचा वेग वाढवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला.

उसाच्या शेतात हे चोर लपून बसले होते.

भरधाव वेगातील कारमधून रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे, प्रवीण काकड आदींनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांनी त्यांच्या हाताला झटका देऊन दुचाकीचा वेग वाढवून पोलिसांची दिशाभूल करून आडवळणी रस्त्याने नेवरगाव शिवारात दुचाकी टाकून दिल्या. पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या धाकाने काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात हे चोर लपून बसले होते. दरम्यान, पावलांच्या ठशावरून शेजारील उसाच्या शेतात चोरटे लपले असावे, असा अंदाज विशेष पोलिस पथकाने केला आणि गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घालण्यात आला. त्यानंतर या विशेष पोलिस पथकाने उसाच्या शेतात घुसून चोरट्यांना जेरबंद केले. 
ग्रामीण विशेष पोलिस पथकाच्या सतर्कतेमुळे पंचवटी परिसरातील घरफोडीमध्ये चोरी गेलेल्या दुचाकींसह चोरटे ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांना घेराव घालून जेरबंद

रविवारी (ता. ३१) सकाळी पंचवटीत घरफोडी करत दुचाकी चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या पाच तासांत जेरबंद केले. विशेष म्हणजे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळताना उसाच्या शेतात लपलेल्या या चोरट्यांना घेराव घालून जेरबंद केले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT