missing girls.jpg 
नाशिक

खळबळजनक! तालुक्यातून युवती होताएत अचानक बेपत्ता; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

संतोष विंचू

नाशिक / येवला : दोन आठवड्यांच्या अंतराने तालुक्यातील दोन युवती बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या मुली घरातून निघून गेल्या की पळवून नेल्या, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

पालकांमध्ये भितीचे वातावरण

शहर पोलिस ठाण्यात नागडे येथील भाऊसाहेब लोणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी अश्विनी (वय १७) २५ जुलैला दुपारी अडीचच्या सुमारास नागडे शिवारातील घरातून आई-वडील बाजारात गेले असताना शौचास जाते, असे लहान बहिणीला सांगून निघून गेली. याबाबत शनिवारी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. गोरी, नाक सरळ, कानात डूल, अंगात निळा पंजाबी ड्रेस व निळी ओढणी परिधान केले असून, ती मराठी बोलते. 
तसेच मुखेड येथील युवतीही चार दिवसांपासून बेपत्ता आहे.

सर्वत्र शोध घेऊनही तपास नाहीच

सुरेखा संपत राऊतराय (२०, रा. मुखेड) ४ ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास घरातील कोणास काहीएक न सांगता मुखेड येथील राहत्या घरातून निघून गेली, ती परत घरी आली नसून तिचा सर्वत्र शोध घेऊनही तपास न लागल्याने किरण संपत राऊतराय यांनी सुरेखा बेपत्ता झाल्याची फिर्याद तालुका पोलिसांत दिली. युवती सावळी, उंची पाच फूट एक इंच, गुलाबी टी- शर्ट व निळी जीन्स पँट परिधान केली असून, पायात गुलाबी बूट आहेत. 

दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

मुखेड येथील २० वर्षीय, तर नागडे शिवारातील १७ वर्षीय अशा दोन युवती बेपत्ता झाल्या असून, तालुका व शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT