shivsena uddhav balasaheb thackeray  esakal
नाशिक

Thackeray Group : उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेची सटाणा शहर कार्यकारिणी जाहीर!

सकाळ वृत्तसेवा

सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सटाणा शहर कार्यकारिणी शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे नुकतीच जाहीर केली. यात शहर प्रमुखपदी रवींद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नियुक्त्यांमुळे पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. (Uddhav Balasaheb Thackeray Group Shiv Sena satana city executive announced maharahstra politics nashik news)

सटाणा शहर कार्यकारिणीत शहर समन्वयक म्हणून सागर पगार, शहरसचिवपदी शरद शेवाळे, उपसचिव नंदू सोनवणे तर उपशहर प्रमुखपदी राजेंद्र खानकरी, सुमित सोनवणे, दिलीप शेवाळे, युनूस मुल्ला यांची निवड करण्यात आली.

यासह तालुका उपप्रमुखपदी सुनील पाटील, जायखेडा शहरप्रमुखपदी निंबा मोहिते यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बागलाण तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, विधानसभा जिल्हा उपप्रमुख गजेंद्र चव्हाण संपर्कप्रमुख जयंत दिंडे आदी उपस्थित होते. सटाणा शहर कार्यकारिणी जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे,अनिल सोनवणे, मुन्ना सोनवणे आदींनी गुलालाची उधळण करीत जल्लोषात नूतन शहर कार्यकारिणीचे स्वागत केले.

"शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत बागलाण तालुका व सटाणा शहरातून शिवसैनिकांचे मोठे जाळे उभारून शिवसेनेची ताकद पुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, सटाणा नगरपालिका व बागलाण विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची खरी ताकद सिद्ध करून वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरविणार." - रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; २० प्रभागांसाठी ५८४ मतदान केंद्रांची अधिकृत घोषणा

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

Viral Video : शिक्षक की हैवान? दिव्यांग मुलाला पाइपने बेदम मारहाण, डोळ्यात फेकली मिरची पावडर; व्हिडिओ पाहून रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही

Shubman Gill: शुभमन गिलची संघात झाली निवड; अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा यांच्यासोबत खेळताना दिसणार; न्यूझीलंडविरुद्ध...

Heart Attack Risks: तुमच्या आरोग्याशी संबंधित 'हे' ४ घटक ठरतायत हृदयाचे शत्रू; ९९% भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका! आजच तपासा

SCROLL FOR NEXT