Nashik sakal
नाशिक

यूजीसी नेट परीक्षा शनिवारपासून वेळापत्रक जाहीर

वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र उपलब्‍ध

अरूण मलाणी

नाशिक : यूजीसी- नॅशनल इलिजिब्‍लीटी टेस्‍ट (यूजीसी- नेट)चे डिसेंबर २०२० आणि जून २०२१ च्‍या सत्रातील परीक्षा कोरोना महामारीमुळे होऊ शकली नव्‍हती. या परीक्षेला शनिवार (ता. २०)पासून सुरवात होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीने दिवस व विषयनिहाय सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ डिसेंबरपर्यंत ही परीक्षा पार पडेल. दरम्‍यान, परीक्षार्थींचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिले आहे.

कधी कोरोना महामारीमुळे, तर कधी अन्‍य स्‍पर्धा परीक्षांच्‍या वेळापत्रकावर परिणाम होत असल्‍याने यूजीसी- नेट परीक्षा पुढे ढकलण्यात येत होती. त्‍यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. ज्‍युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पात्रता मिळविण्याच्‍या या परीक्षेला अखेर मुहूर्त लागला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्‍या तारखांनुसार ही परीक्षा शनिवार (ता. २०)पासून ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. संगणकावर आधारित (कॉम्प्युटरबेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा असेल.

८० विषयांची होईल परीक्षा

राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी ‘एनटीए’ने विषय, विद्या शाखेनिहाय परीक्षांचे नियोजन केले आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या ८० विषयांची यूजीसी- नेट परीक्षा होणार आहे. यात भाषा विषय, परदेशी भाषांचा समावेश असणार आहे. परीक्षा कालावधीत दोन सत्रात पेपर घेण्यात येतील. संकेतस्‍थळावर दिवस व सत्रनिहाय वेळापत्रक उपलब्‍ध करून दिले आहे, तर प्रवेशपत्र टप्प्‍याटप्प्‍याने उपलब्‍ध केले जात असल्‍याची माहिती एनटीएने परिपत्रकात नमूद केली आहे.

दुसऱ्या टप्प्‍यात काही विषयांची परीक्षा

संस्कृत, सामाजिकशास्‍त्र, भूगोलसह हिंदी, गृहविज्ञान, बंगाली, कन्नड या विषयांच्‍या परीक्षा १५ ते २३ डिसेंबरदरम्‍यान होणार आहेत. परीक्षेचे सत्रनिहाय सविस्‍तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT