umrah.jpg 
नाशिक

कोरोना संसर्गाचा धोका अन्‌ उमराह यात्रा स्थगित..? 

युनूस शेख : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता सौदी सरकारने पवित्र उमराह यात्रा अनिश्‍चित काळासाठी स्थगित केली आहे. त्या आशयाचे पत्रही खासगी टूर्स आणि हज कमिटीच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे. सर्वांत पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रेच्या काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

भाविकांत नाराजी : खासगी टूर्स आणि हज कमिटी कार्यालयास पत्र प्राप्त 
जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेच्या निमित्ताने सौदीत हजेरी लावत असतात. सर्वांना आर्थिक परिस्थितीमुळे हज यात्रा शक्‍य नसल्याने अलीकडे उमराह यात्रेचे महत्त्व वाढले आहे. वर्षभर भाविकांकडून उमराह यात्रा केली जाते. सध्याही देशभरातील लाखो भाविक उमराह यात्रेस गेले आहेत. त्यातील काही परतले आहेत, तर काही अद्यापही त्या ठिकाणी आहेत. यात शहर, जिल्ह्यातीलही भाविकांचा सहभाग आहे. देशभरातील लाखो, तर जिल्ह्यातील सुमारे हजाराहून अधिक भाविक मार्च महिन्यात यात्रेस जाण्याच्या तयारीत होते; परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने सौदी सरकारकडून यात्रा स्थगित करण्यात येऊन व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. देशातून सौदीसाठी जाणारी विमानसेवाही बंद करण्यात आली आहे. सौदीमधून विमानसेवा केवळ त्या ठिकाणी गेलेल्या भाविकांना परतीसाठी सुरू ठेवण्यात आली आहे.

भारतासह विविध देशांसाठी यात्रा स्थगित

भारतासह विविध देशांसाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र गुरुवारी (ता. 27) शहरातून यात्रेचे आयोजन करणाऱ्या टूर्स कंपन्या आणि हज कमिटीच्या कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती टूर्स चालकांकडून देण्यात आली. पुढील सूचनेपर्यंत यात्रा स्थगित राहणार असल्याचेही सांगण्यात आले. इतकेच नाही तर पर्यटकांनाही व्हिसा नाकारण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे तसेच सौदीत दाखल असलेले भाविक आणि येथील जनतेच्या सुरक्षिततेसाठी पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी हज यात्रेवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी भाविकांकडून प्रार्थना केली जात आहे. 

सौदी सरकार व्हिसा देत नसल्याने... 
उमराह यात्रेवरील स्थगितीने भाविक नाराज झाले आहेत. अनेक भाविकांचे पूर्वीचे बुकिंग होते. सौदी सरकार व्हिसा देत नसल्याने काही करता येत नाही. आगामी यात्रेच्या नोंदणीवर त्याचा परिणाम झाला आहे. -रशीद शेख (टूर्सचालक) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT