Nashik News  esakal
नाशिक

Nashik News : विनापरवानगी डीजेचा दणदणाट; पोलिसांकडून आवाजांच्या नोंदी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर डीजे वाजविण्यास बंदी असताना काही मंडळांनी डीजेचा दणदणाट करीत शिवजयंती साजरी करीत पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. दरम्यान, पोलिसांनी संबंधित मंडळांच्या डीजेच्या आवाजाच्या नोंदी नोंद केल्या असून यापुढील कारवाईकडे आता लक्ष लागून आहे

शिवजयंती पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील शिवजन्मोत्सव समिती व शिवजयंती मिरवणूक पदाधिकाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बैठक घेत डीजे वाजविण्यावर बंदी कायम असल्याचे सांगितले होते. (Unauthorized DJ noise recording of sounds by police attention to police action Nashik News)

मात्र, डीजेला परवानगी नसतानाही शिवजयंतीला पंचवटी, नाशिक रोड, अंबड, सातपूर, म्हसरूळ व आडगाव येथील शिवजयंती देखावे व मंडळाजवळ डीजेचा दणदणाट करण्यात आला. डिस्को लाइट, डीजे किट, जंबो साउंड लावून रिमिक्स गाणे व म्युझिक वाजविण्यात आले.

दरम्यान, पंचवटी व अन्य भागातील विविध मित्र मंडळांनी देखाव्यांजवळ लावलेल्या साउंडच्या आवाजाची नोंद पोलिसांनी केली आहे. त्यामुळे आता पोलिस यासंदर्भात काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.

न्यायालयाच्या आदेशान्वये डीजे वाजविण्यावर बंदी आहे शिवजयंती दिनी पोलिसांनी मंडळांच्या आवाजाच्या तीव्रतेच्या नोंदी घेतले आहेत त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.

- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT