Late Grishma Kulkarni esakal
नाशिक

आईस्क्रिम बेतलं चिमुकलीच्या जीवावर; विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु

नरेश हाळणोर

नाशिक : उंटवाडी येथे आईस्क्रिम घेण्यासाठी वडिलांसमवेत दुकानात गेलेल्या चिमुरडीचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाला. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी (४, रा. सुखशांती बंगलो, जगताप नगर, मातोश्री चौक, उंटवाडी) असे चिमुकलीचे नाव आहे. (Unfortunate death of girl Child due to electric shock of Ice Cream fridge wire Nashik Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास विशाल कुलकर्णी हे त्यांच्या चार वर्षांची मुलगी ग्रीष्मा हिला आईस्क्रिम घेण्यासाठी घराबाहेर पडले. राहत्या घराजवळच असलेल्या प्रसन्न सोनार यांच्या मेडिकल दुकानात ते आईस्क्रिम घेण्यासाठी गेले. त्यावेळी दुकानातील फ्रिजच्या वायरचा शॉक ग्रीष्मा हिला बसला आणि ती जागेवरच बेशुद्ध पडली.

त्यावेळी उपचारासाठी विशाल कुलकर्णी यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव धुम यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, सदरच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुलकर्णी कुटूंबियांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT