Wedding Family Moment esakal
नाशिक

"पप्पामम्मीच्या लग्नाला यायचं हं!"; एका लग्नाची ‘दुसरी’ भन्नाट गोष्ट

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : जोडपं तेच... परंतु, तब्बल पंचवीस वर्षांनी पुन्हा नवरदेव- नवरी होण्याचा अनोखा योग लाभलेले हे अनोखं जोडपे. मुला- मुलींनी आपल्या पप्पा- मम्मीच्या लग्नाच्या वाढदिवसाचे (Marriage Anniversery) औचित्य साधून हळदीपासून ते मंगलाष्टकापर्यंत लग्नाचा (wedding) दुसऱ्यांदा योग जुळवून आणला. मम्मी- पप्पाचे लग्न अनुभवण्याची इच्छा लेकरांनी सत्यात उतरवली. पन्नाशीच्या उंबरठ्यावरच्या नवरदेव- नवरीचा लग्न सोहळा वऱ्हाडी मंडळींसह उपस्थितांमध्ये सुखाचे चांदणे पेरणारा ठरला. गत स्मृतींना जागा करणारा अन्‌ स्मृती जाग्या करत आनंद देणाऱ्या जवळच्या नातलगांच्या आठवणीने गहिवर दाटून येणाऱ्या अजब लग्नाची ही गोष्ट! मालेगावातील निकम परिवाराचा हा अनोखा लग्नसोहळा सध्या सर्वतोमुखी चर्चेत आहे. (Unique gift from son daughter to mother father on 25th marriage anniversary Nashik News)

मालेगाव येथील निसर्ग ॲग्रोचे संचालक धनंजय निकम आणि पत्नी भावना निकम यांच्या लेकरांनी पप्पा- मम्मीच्या पंचविसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने घडवून आणलेला हा लग्न सोहळा गुरुवारी (ता. १९) झाला. एमबीबीएसच्या (MBBS) अंतिम परीक्षा देऊन घरी आलेली मुलगी गौतमी अन्‌ मुलगा विनीत यांनी ‘पप्पा- मम्मीचे पुन्हा लग्न लावू या’ अशी संकल्पना मांडली. सौ. शुभांगी आपल्या जेठानीच्या तयारीला लागली. पंचवीस वर्षापूर्वी परिस्थिती बेताचीच! धनंजय व अविनाश निकम या भावंडांनी नोकरीचा नाद सोडत स्वतःच्या हिमतीवर ॲग्रो केमिकल विक्री व्यवसायात पाऊल ठेवले आणि नावारूपाला आले आहेत. वडील धनंजय व आई भावना यांच्या लग्नाच्या जय्यत तयारीसाठी निकम परिवार एकवटला. जवळच्या नातलगांसाठी डिजिटल पत्रिका, मित्र परिवाराला आमंत्रण पाठवली.

नाशिक : कारवाईचा बडगा उगारताच कर्मचाऱ्यांची यादी हातातअजब लगीनघाई!
‘पप्पा- मम्मीच्या लग्नाला यायचं हं’ ही लेकरांनी नातलगांना घातलेली साद निमंत्रितांकडून होकारार्थी हसरी दाद आनंद देऊन गेली. अवघा निकम परिवार अनोख्या विवाहाच्या धावपळीत व्यस्त झाला. मेहंदीचा कार्यक्रम झाला. मुंडावळ्या आणल्या. घरगुती बस्ता झाला. पारंपरिक गाणी म्हणत नवरीला हळद लावली. लग्नासाठी निश्‍चित केलेल्या भव्य हॉलमध्ये वरातीत लेकरांसह वऱ्हाडी मनसोक्त नाचले. गोरज मुहूर्तावर लग्न झाले. पुरोहितांनी मंगलाष्टकांतून वधू- वरांना पुन्हा एकदा ‘शुभमंगल सावधान’चा मंत्रोच्चार केला. अक्षतांद्वारे वधु- वर पुन्हा एकदा आशीर्वादाचे धनी झाले. एकमेकांना हार घालत जन्मोजन्मीच्या गाठी अधिक घट्ट झाल्या. हा सारा माहौल वधू- वरांसह अवघ्या वऱ्हाडींना वेगळी अनुभूती देणारा ठरला.

पुन्हा एकदा कन्यादानाचा योग
पंचवीस वर्षांपूर्वीच्या स्मृती जागवणाऱ्या सोहळ्यात वरमाई गं. भा. यमुनाबाई पती अभिमन निकमांच्या गैरहजेरीने गहिवरून गेल्या. वधू जेठाणीच्या लग्नात देराणी सौ. शुभांगी कार्यवाहक बनली. वधूच्या वृद्ध आई- वडिलांना पुन्हा एकदा कन्यादानाचा योग जुळून आला. विवाह समारंभात नव्या प्रथा बघून ‘राहून गेल्याचे शल्य’ मिटवता आल्याने वधु- वर आनंदित झाले. या धामधुमीत एमबीबीएसच्या अंतिम परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याची वार्ता गौतमीला कळली अन्‌ वधु- वर आई- वडीलांच्या शुभेच्छांच्या पंक्तीत विराजमान झाली. मुलगी डॉक्टर झाल्याची वार्ता सोहळ्याला अधिक आनंदी देणारी ठरली. सध्या या लग्नाची चर्चा सुरू असून, वधू- वरांसह डॉक्टर लेकीचे कौतूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT