chori yeola.jpg 
नाशिक

VIDEO : धक्कादायक' प्रकार! घरात उकाडा होत असल्याने कुटुंब झोपले गच्चीवर...त्यातच घडले असे की सर्वांनाचा धक्का!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे शहरी भागात लॉकडाऊन असल्याने संपूर्ण कुटुंबासह नागरिक घरीच राहत असल्याने चोरट्यांनी सध्या ग्रामीण भागाकडे चोरीसाठी आपला मोर्चा वळवला आहे. तालुक्यातील गोल्हेवाडी येथील दिलीप जाधव हे आपल्या कुटुंबासह उन्हाळा असल्याने घरात उकाडा होतो म्हणून गच्चीवर झोपले होते. यानंतर जे काही घडले ते थरारक होते.

अशी घडली घटना

कोरोनामुळे शहरी भागात लॉकडाऊन असल्याने संपूर्ण कुटुंबासह नागरिक घरीच राहत असल्याने चोरट्यांनी सध्या ग्रामीण भागाकडे चोरीसाठी आपला मोर्चा वळवला आहे. तालुक्यातील गोल्हेवाडी येथील दिलीप जाधव हे आपल्या कुटुंबासह उन्हाळा असल्याने घरात उकाडा होतो म्हणून गच्चीवर झोपले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिलीप जाधव यांच्या घरात या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील लाकडी कपाट आणि लोखंडी कोठी मध्ये असलेले ट्रॅक्टर घेण्यासाठी नातेवाइकांकडून आणलेले तीन लाख रुपये रोख, तसेच घरातील सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, नेकलेस, कानातील वेल असे सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी डल्ला मारत धाडसी चोरी करून पोबारा केल्याची घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झाली. पहाटे उठून गच्चीवरून खाली आल्यानंतर अज्ञात चोरांनी चोरी केल्याचे उघड झाले. 

येवला) तालुक्यातील गोल्हेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये रोख रक्कम व पाच तोळे सोन्याची धाडसी घरफोडी केल्याची घटना घडल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीत सुमारे पावणेपाच लाखावर डल्ला मारला गेला आहे.घरी चोरी झाल्याची माहिती येवला तालुका पोलिसांना दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होत चोरांना पकडण्यासाठी नाकेबंदी केली मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंग साळवे, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचं' सुरज चव्हाणने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...'मी त्याचा सारखा एकदाच पण टॉप...'

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT