Chief Minister Eknath Shinde inspecting the damaged grape crop due to unseasonal rain and hail and taking information from the farmers. esakal
नाशिक

Unseasonal Rain Nashik : मुख्यमंत्री दौऱ्यानंतर सर्तक यंत्रणेकडून पंचनाम्याला गती

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Nashik : जिल्ह्याला अवकाळी पावसाच्या पुन्हा मोठा दणका बसला आहे. मागील वर्षी दोनदा झालेल्या नुकसानीची मदत दिलेली नसतांना यंदा पुन्हा अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सटाणा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. (unseasonal rain Bad weather and hailstorm hit 8 thousand hectares in district nashik news)

पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आज (ता.१०) अवकाळी अन्‌ गारपिटीच्या नुकसानीसाठी सक्रिय झाली. नुकसान झालेल्या भागात त्वरित पंचनाम्यासह मदतीसाठी कामाला लागली.

दरम्यान एकाच दिवसाच्या नुकसानीत जिल्ह्यात ८ हजाराहून अधिक हेक्टरवर दणका बसल्याचे पुढे आले. आणखी दोन दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह होणाऱ्या पावसाने झाडांच्या फांद्या उन्मळून पडूनही नुकसान झाले. शहरातील वीज पुरवठा बराच वेळ खंडित ठेवावा लागला. विजेच्या तारा तुटून आणि कंडक्टर फुटल्याने वीज प्रवाह जाण्याचे रात्रभर प्रकार सुरू होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

हवामान विभागाने गुरवारपर्यत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात, उत्तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्याचा समावेश असल्याने आपत्ती व्यवस्थापन, कृषी आणि महसूल अशा सगळ्याच यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. जिल्ह्यात प्रशासनाकडून आज देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ८ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे.

त्यात सर्वाधीक ५६६८ हेक्टर नुकसान हे एकट्या सटाणा तालुक्यात झाले आहे. रविवारच्या पावसाने १४५ गावातील १३ हजार २८४ शेतकऱ्यांच्या पिकाला पावसाने दणका दिल्याचे पुढे आले आहे.

पीक निहाय नुकसान

कांदा ५८१४ हेक्टर

द्राक्ष ७७५

डाळिंब ७७३

गहू २२७

भाजीपाला २१३

मका २१७

टोमॅटो ५४

वेल वर्गीय फळे ३५

चारा पीक ३०

हरभरा १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार, सुनीताने वांद्रे कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज; कोणकोणते आरोप केले?

Ganesh Chaturthi 2025 : 'या' गणेश चतुर्थीला एक-दोन नाही तर बनत आहेत 5 महायोग; या राशींवर बाप्पा होणार खुश

Video: थरारक! पवई तलावामध्ये मगरीने कबुतराला गिळले; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Hidden Liver Damage: लक्षणं न जाणवता यकृत होतंय कमजोर… ‘सायलेंट किलर’बाबत डॉक्टरांचा धोक्याचा इशारा!

Sharad Pawar: उपराष्ट्रपतीसाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या, मुख्यमंत्र्यांचा मला फोन, खुलासा करत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT