ramshej marathi movie poster esakal
नाशिक

Upcoming Marathi Movie : ‘पावनखिंड’नंतर लवकरच येणार ‘रामशेज’!

सकाळ वृत्तसेवा

Upcoming Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या काही वर्षात झालेले फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

यानंतर आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Upcoming Marathi Movie After Pawankhind Ramshej will come soon nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ‘रामशेज’ या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘मुरारबाजी’ चित्रपटाचे निर्माते ‘रामशेज’ चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात येईल. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही शिवाजी महाराजांचा मावळा आणि त्यामागे प्रभू श्रीरामांची छाया दाखवण्यात आली आहे. ‘रामशेज’ चित्रपटात अभिनेता अंकित मोहन प्रमुख भूमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Admapur land Scam : लाखात घेतली, कोट्यवधींना देवस्थानला विकली; बाळूमामा ट्रस्ट जमिनीत 11 कोटींचा गैरव्यवहार, पाच मध्यस्थींना केली अटक

Shiv Sena Political Clash : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी 'युद्ध'; दिशा सालियन प्रकरणाला 'गद्दारी'वरून प्रत्‍युत्तर, वादग्रस्त विषयांना पोलिस परवानगीने आश्चर्य

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

SCROLL FOR NEXT